Ticker

6/recent/ticker-posts

सिंचन विहिरीचा लाभ मिळून देण्याचे अमिष फक्त ९७ सिंचन विहिरी मंजूर : पातूर तालुक्यातील चित्र

सिंचन विहिरीचा लाभ मिळून देण्याचे अमिष फक्त ९७ सिंचन विहिरी मंजूर : पातूर तालुक्यातील चित्र


प्रतिनिधी : नासीर शेख
पातूर : पातुर तालुक्यात सिंचन विहिरीचे १५७६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी फक्त ९७ सिंचन विहिरी मंजूर झाल्या आहे. पातुर तालुक्यामध्ये ५७ ग्राम पंचायत आहे. तालुक्यात ८५५ सिंचन विहिरीचे उद्दिष्ट होते. गेल्या काही महिन्यापूर्वी पातूर पंचायत समितीने प्रत्येक ग्राम पंचायत कडून सिंचन विहिरीचे प्रस्ताव मागविले होते. सिंचन विहिरीचा लाभ मिळून देण्याचे अमिष दाखवून अनेक गावातील दलालांनी सिंचन विहिरीच्या लाभार्थ्याकडून ,२० ते २५ हजार रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा तालुक्यात होती. पातुर तालुक्यामध्ये जवळपास ९५ गाव असून, केवळ ९७ सिंचन विहिरी मंजूर झाल्या आहे.या मंजूर झालेल्या ९७ सिंचन विहिरीमध्ये कोण कोणत्या लाभार्थ्यांचा नंबर लागला अशी उत्सुकता लाभार्थ्यांना लागली आहे.



लाभार्थ्यांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्याची मागणी
पातुर तालुक्यातील अनेक गावात सिंचन विहिरीच्या लाभासाठी दललांकडून मोठी रक्कम घेण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र आता गावातील सिंचन विहिरी मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची यादी ग्राम पंचायत कार्यालयावर लावण्याची मागणी होत आहे.



अनेक गावातील ग्रामस्थांमध्ये संभ्रम
पातुर तालुक्यातील केवळ ९७ सिंचन विहिरी मंजूर झाल्या आणि अनेकांनी विहिरीच्या लाभासाठी दलालांशी आर्थिक व्यवहार केले, मात्र मंजूर झालेल्या ९७ सिंचन विहिरीमध्ये कोणाची वर्णी लागली असे संभ्रम सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यामध्ये निर्माण झाला आहे.

 बातम्यांचे सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या