Ticker

6/recent/ticker-posts

वृक्ष लागवडीत घोळ प्रकरणाची चौकशी गुलदस्त्यात ! १८ जून पासून आमरण उपोषण

वृक्ष लागवडीत घोळ प्रकरणाची चौकशी गुलदस्त्यात ! १८ जून पासून आमरण उपोषण


प्रतिनिधी नासीर शेख 
पातूर : पातुर तालुक्यातील चान्नी खेट्री तांदळी बू. सस्ती सुकळी सांगोळा चतारी आदी परिसरात वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात घोळ सुरू असल्याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मंगेश धोत्रे यांनी २० मे रोजी गटविकास धिकारी व संबंधित वरिष्ठ अधिकार्‍याकडे केली होती. तसेच गेल्या काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनील फाटकर व जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी २२ मे रोजी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये वृक्ष लागवडीत घोळ सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु चौकशी होत नसल्याने १८ जून पासून पातूरच्या पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा मंगेश धोत्रे यांनी पातुरचे गटविकास अधिकारी यांना ११ जून रोजी दिलेल्या निवेदनातून दिला आहे.


दोन आठवडे उलटूनही चौकशीस दिरंगाई
वृक्ष लागवडीत घोळ केल्याप्रकरणी पंचायत समितीमध्ये अनेक तक्रारी धुळखात असून, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी समिती गठीत करून चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु दोन आठवडे उलटूनही चौकशी करण्यास दिरंगाई होत आहे.


चौकशी आधी वृक्ष लागवडीची धूम
वृक्ष लागवडीत घोळ सुरू असल्याबाबतच्या तक्रारीवरून प्रकरण उघडकीस आल्याने चौकशी होणार असल्याच्या भीतीमुळे वृक्ष लागवडीची धूम सुरू असून, याची सुद्धा चौकशी करण्याची गरज आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या