Ticker

6/recent/ticker-posts

घरकुल मजुराकडून पैशे वसुलीची मागणी, खेट्रीच्या सरपंचाविरुद्ध रोजगार सेवकाची तक्रार

घरकुल मजुराकडून पैशे वसुलीची मागणीखेट्रीच्या सरपंचाविरुद्ध रोजगार सेवकाची तक्रार


प्रतिनिधी नासीर शेख
पातूर : पातुर तालुक्यातील खेट्री येथे लाभार्थ्यांचे घरकुल बांधकामासाठी रोजगार मजुराकडून पैशे वसुलीची मागणी सरपंच जहुर खान यांच्याकडून केली जात असल्याचा आरोप रोजगार सेवक शेख उस्मान यांनी १४ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. घरकुल बांधकाम करणारे मिस्तरी व मजूर यांच्या बँक खात्यात त्यांची मजुरीचे पैशे शासनाकडून जमा केले जातात, परंतु लाभार्थ्यांचे घरकुल मी मंजूर करून आणले त्यामुळे लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामावर दाखविलेल्या मजुरांच्या पैशावर माझा अधिकार आहे. त्यामुळे मजुराकडून पैशाची वसुली करून आणून दे अन्यथा रोजगार सेवक पदावरून कमी करण्याची धमकी व जीवे मारण्याची धमकी सरपंच यांच्याकडून रोजगार सेवक शेख उस्मान यांना दिली जात असल्याचा आरोप रोजगार सेवक शेख उस्मान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.


प्रतिक्रिया
लाभार्थ्यांचे घरकुल बांधकामासाठी मिस्तरी, मजूर असल्याची पाहणी व लाभार्थ्यांची परवानगी घेऊनच रोजगार मजुरांचे मस्टर टाकून त्यांच्या खात्यात मजुरीचे पैशे जमा होतात. परंतु सरपंच जहुर खान यांच्याकडून त्यांच्या मजुरीच्या पैशाची वसुलीची मागणी करीत आहे.
- शेख उस्मान रोजगार सेवक खेट्री




प्रतिक्रिया
दबाव व धमकी खपून घेणार नाही
घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांची परवानगी घेऊन मजुरांचे मस्टर टाकल्यानंतर मजुरांच्या खात्यात पैशे जमा होतात.मात्र रोजगार सेवकाला पैशाची मागणीसाठी दबाव टाकून पदावरून कमी करण्याच्या धमक्या दिल्या जात आहे.आम्ही दबाव व धमकी खपून घेणार नाही,संघटना शेख उस्मान यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
तसावर खान तालुका अध्यक्ष रोजगार सेवक संघटना पातूर



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या