Ticker

6/recent/ticker-posts

सरपंचावर पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप, खेट्रीच्या सरपंचाकडून होतोय आर्थिक लाभाची मागणी

सरपंचावर पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप, खेट्रीच्या सरपंचाकडून होतोय आर्थिक लाभाची मागणी


प्रतिनिधी नासीर शेख 
पातूर : पातुर तालुक्यातील खेट्रीचे सरपंच जहूर खान हे पदाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना १४ जून रोजी दिलेल्या निवेदनातून केला आहे. खेट्री येथे कृष्णाआप्पा नथाआप्पा डहाळे,मोहम्मद हयात,अशोक भिकाजी गावंडे , यांनी मनरेगा अंतर्गत चंदनची लागवड केली होती. परंतु सरपंच यांनी आर्थिक लाभासाठी गेल्या काही महिन्यापासून चंदन लागवडीची मजुरी रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे चौकशी करून पदाचा दुरुपयोग करणाऱ्या खेट्री येथील सरपंच जहूर खान यांच्यावर कारवाई करून प्रलंबित असलेली चंदन लागवडीची मजुरी मिळवून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. यावर संबंधितांकडून काय कारवाई होते. याकडे चंदन लागवड लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.


हुकुमशाही कारभारला ग्रामस्थ वैतागले
गेल्या काही महिन्यापासून खेट्रीचे सरपंच यांचा हुकूमशाही कारभार सुरू आहे. आर्थिक लाभासाठी रोजगार सेवक व रोजगार मजुरांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे सरपंचाच्या हुकूमशाही कारभाराला ग्रामस्थ वैतागले आहे.


प्रतिक्रिया
मनरेगा अंतर्गत आम्ही चंदन लागवड केली, मात्र सरपंचाकडून आर्थिक लाभाची मागणी होत आहे. आर्थिक लाभाची मागणी पूर्ण न केल्याने सरपंचाकडून चंदन लागवडीची मजुरी रोखण्यात आली आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
- अशोक भिकाजी गावंडे खेट्री


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या