Ticker

6/recent/ticker-posts

गुरुमाऊलींचे वारस आप्पासाहेब मोरे यांच्या दर्शनाचा मिळाला लाभ - खासदार अनुप धोत्रे

गुरुमाऊलींचे वारस आप्पासाहेब मोरे यांच्या दर्शनाचा मिळाला लाभ - खासदार अनुप धोत्रे


अकोला 
सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये मनुष्य अनेक संकटातून व समस्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे श्री स्वामी समर्थ परिवार दिंडोरी संस्था अध्यात्म आणि धर्म शांती संस्कृती परंपरा च्या माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद आणि विश्वास व यशस्वी जीवन जगण्याची कला निर्माण करण्याचं काम परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनात करत असून देशभरात कोट्यावधी भक्त असून गुरुमाऊलींचे वारस आप्पासाहेब मोरे यांच्या दर्शनाचा व सानिध्याचा लाभ सहवासाचा व अध्यात्म सामाजिक चर्चा करण्याचा लाभ मिळाला हे सौभाग्य असल्याचे प्रतिपादन निर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांनी केले. 



गुरु माऊली चे अकोला सामूहिक परिचय संमेलनानिमित्त खडकी येथे आगमन झाल्यावर माहिती मिळाल्याबरोबर स्वामी समर्थ आणि गुरुमाऊली चे दर्शनासाठी खासदार धोत्रे यांनी परमपूज्य मोरे महाराज यांचे आशीर्वाद घेतले यावेळी महाराजांनी भेट वस्तू देऊन खासदार धोत्रे यांच्या व त्यांचे अभ्यास वृत्तीने अकोला लोकसभेचा विकास होऊन सर्वसामान्यांना आधार मिळेल असा आशीर्वाद प्रधान करून माऊली परिवार स्वामी समर्थ परिवार खंबीरपणे खासदार धोत्रे यांच्या पाठीशी उभे असून त्यांच्या चांगल्या कामाला धर्म आणि संस्कृती तसेच परंपरेला नेहमी सहकार्य असेल त्यांच्या मार्गदर्शनात अकोला लोकसभा मतदारसंघाचा विकास घडेल असा विश्वास गुरुमाऊली यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी समर्थ कोचिंग क्लासेस नितीन बाटे, परिवाराचे रवी विसपुते राजेश दिनोदिया, एडवोकेट देवाशिष काकड, ठाकूर गिरीश जोशी माधव मानकर राघव टाले उपस्थित होते


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या