Ticker

6/recent/ticker-posts

वाईन शॉप मालकास अडवुन काठीने मारून त्यांचे जवळील १ लाख ४५ हजार रूपयाची बॅग लंपास करणारी टोळी जेरबंद

वाईन शॉप मालकास अडवुन काठीने मारून त्यांचे जवळील १ लाख ४५ हजार रूपयाची बॅग लंपास करणारी टोळी जेरबंद

 मुर्तीजापूर-  संतोष माने 
सदर गुन्हयाची हकीकत अशा प्रकारे आहे की पोलीस स्टेशन मुर्तीजापुर शहर जि. अकोला येथे दिनांक ०८/०५/२०२४ रोजी फीर्यादी राजेश मुलचंद गुप्ता वय ४४ वर्ष रा. शिवाजीनगर मुर्तीजापुर यांनी जबानी रीपोर्ट दिला की, त्यांचे गुपता वाईन शॉपी असुन नमुद घटना तारीख वेळी व ठीकाणी फीर्यादी हे दिवसभरातील व्यवहाराचे १,४५००० रू बॅग मध्ये घेवुन मोटार सायकलने त्यांचे घरी जात असतांना दोन मोटार सायकलवर आलेल्या ४ ते ५ अज्ञात इसमांनी त्यांना अडवुन फीर्यादीचे मोटार सायकलला लाथ मारून फीर्यादीस मोटार सायकल सह खाली पाडुन फीर्यादीस लाकडी काठीने मारून त्यांचे जवळ असलेली १,४५००० रू रक्कम असलेली बॅग जबरदस्तीने हीसकावुन घेवुन गेले. अशा फीर्यादीचे जबानी रीपोर्ट वरून पोलीस स्टेशन मुर्तीजापुर शहर येथे अप क १९३/२४ कलम ३९४,३४ भा दं वी अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला.


सदर गुन्हयाचे तपासात मीळालेल्या माहीतीवरून १) विशाल बाबुलाल राउत वय १९ वर्ष रा. थीलोरी ता. दर्यापुर जि. अमरावती २) यश नंदकीशोर ननीर वय २० वर्ष रा. गौतमनगर मुर्तीजापुर ३) महेश सुधाकर गवई वय २२ वर्ष रा. जुने घरकुल मुर्तीजापुर ४) सौरभ शशिकांत बाळापुरे वय २१ वर्ष रा. काळा गोटा मुर्तीजापुर ५) अमरदीप राजेंद्र मोहोड वय २२ वर्ष रा. पहाडीपुरा, मुर्तीजापुर यांना गुन्हयासंबंधाने सविस्तर विचारपुस केली असता गुन्हयाची कबुली दिली. आरोपीतांकडुन गुन्हयात वापरलेली मोटार सायकल हीरो स्प्लेंडर कंपनीची एम एच २७ डी पी ८२६२ की १,२०००० रू ची, एक पॅशन प्रो मोटार सायकलक एमएच ३० ए एच ६३९५ की ३६००० रू ची, एक जुना वापरता मोबाइल रेड नोट १० प्रो कंपीनीचा किं २१००० रू तसेच नगदी २०००० रू असा एकुन १९७००० रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीतांना गुन्हयाबाबत सविस्तर विचारपुस सुरू आहे.


सदरचा गुन्हा मा. पोलीस अधिकक्षक श्री बच्चन सिंग, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मनोहर दाभाडे, याचे मार्गदर्शनाखाली पो. नि. भाऊराव घुगे, ए पी आय अनंतराव वडतकर, पो उप नि गणेश सुर्यवंशी, पोउपनि शामसुंदर तायडे, पोहवा सुरेश पांडे, नंदकीशोर टिकार, सचिन दांदळे, मंगेश विल्हेकर, पो कॉ सचिन दुबे, गजानन खेडकर, स्वप्नील खडे, भुषन नेमाडे, नामदेव आडे यांनी सदरचा गुन्हा उघड करण्यात यश मीळवीले असुन पुढील तपास पो नि भाऊराव घुगे यांचे मार्गदर्शनाखाली ए पी आय अनंतराव वडतकर करीत आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या