Ticker

6/recent/ticker-posts

इरानी परिसरातील हत्ते प्रकरणी गुन्हयातील फरार झालेले दोन्ही आरोपी अटक

इरानी परिसरातील हत्ते प्रकरणी गुन्हयातील फरार झालेले दोन्ही आरोपी अटक 


१२ जुन २०२४ रोजी ८.००वा दरम्यान आरोपी नामे अविनाश अनिल इंगळे, वय १९ वर्षे रा. ईराणी झोपडपटट्टी, अकोला व त्याचा साथीदार कुलदीप उर्फ शिवा सुरेश झीमुंर्डे, वय २४ वर्षे रां. मराठानगर, अकोला यांनी संगणमत करून मृतक नामे मोहम्मद अन्सार मोहम्मद सलीम, वय ५० वर्षे रा. लक्कडगंज, न्युबैदपुरा, अकोला याचा संगणमत करून जुन्या वादावरून ईराणी झोपडपटट्टी, अकोला येथे खुन करून पळुन गेले यावरून पो.स्टे. सिटी कोतवाली, अकोला येथे अप कं १९७/२०२४ कलम ३०२, ३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


पो.स्टे. सिटी कोतवाली, अकोला येथील गुन्हे शोध पथक (डि.बी) चे पोलीस अंमलदार यांनी वर नमुद फरार आरोपीतांचा तात्काळ शोध घेवुन सदर आरोपीतांना ०८ तासांच्या आत अटक करून विदय. न्यायालय समक्ष हजर केले असता विदय. न्यायालयाने नमुद आरोपीतांचा दि. १७/०६/२०२४ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केला आहे व सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंग साहेब, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अकोला सतीष कुळकर्णी साहेब, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पोलीस निरीक्षक शंकर शेळके साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अकोला येथील पोलीस निरीक्षक सुनिल वायदंडे साहेब, पोलीस उपनिरीक्षक बुध्दू रेगीवाले व गुन्हे शोध पथक (डि.बी.) चे पोलीस अंमलदार पोहवा. महेंद्र बहादुरकर, पोहवा. अश्वीन सिरसाट, पोहवा. अमीत दुबे, पोहवा. ख्वाजा शेख, पोहवा. आतीष बावस्कर, पोकॉ. निलेश बुंदे, पोकॉ. किशोर येउल, पोकॉ. अमोल दाळु यांनी प्रत्यक्ष कार्यवाही पार पाडली आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या