बोलेरो गाडी व ट्रॅक्टर चा अपघातात तीन जण जखमी, वणी रंभापुर नजीकची घटना
प्रतिनिधी- राहूल खाडे
राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत वणी रंभापुर नजीक प्रवासी बोलोरो गाडी ट्रॅक्टर च्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दरम्यान घडली, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू कडून ट्रॅक्टर क्रमांक एम एच 30 बी बी 0544 जात होता, पाठीमागून येणाऱ्या प्रवासी वाहु बोलोरो क्रमांक एम एच 33 व्हि 45 86 या गाडीने समोरच्या महामार्गावरुन जाणाऱ्या ट्रॅक्टर ला जबरदस्त धडक दिली, या अपघातात ट्रॅक्टर चे मोठे चाख फुटले व नुकसान झाले,एवढी मोठी धडकली,तर कारचे समोरच्या भागाचे नुकसान झाले, दरम्यान या अपघातात ट्रॅक्टर चा चालक गंभीर जखमी झाला तर प्रवासी बोलोरो गाडीतील एक चिमुकली सह एक महीला जखमी झाली, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश काळे हेडकॉन्स्टेबल किशोर सोळंके यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करुन जखमींना रुग्णालयात दाखल केले,
------------------------
पत्रकार मोहोड यांनी जोपासली माणूसकी
राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असते,अपघात झाला म्हणजे लोक उगाच नाही ताप नको म्हणून बघ्यांची भुमिका घेत आपल्या कामाला निघून जातात, परंतु अश्या वेळेस अपघातात जखमी झालेल्या प्रवासी किंवा वाहन चालकांना मदतीची गरज असते, शिवाय अनेक वेळा मदत वेळेस मिळाली नाही तर अपघातात जखमींच्या जीवाचे बरेवाईट अनुभव आहेत, दरम्यान वणी रंभापुर नजीक अपघाताची माहिती बोरगाव मंजू येथील पत्रकार देवानंद मोहोड यांना मिळाली वरुन मोहोड यांनी माणुसकीचा प्रतय देत घटनास्थळी धाव घेऊन बोरगाव मंजू पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांना अवगत केले, शिवाय जखमींना वेळेस उपचार व्हावेत यासाठी संबंधित विभागाला रुग्णवाहिका मिळवण्यासाठी धावपळ करून पोलिस प्रशासना सह जखमींना रुग्णालयात उपचार करण्यासाठी विशेष प्रयत्न करुन पत्रकार देवानंद मोहोळ यांनी माणूसकी आजही कायम आहे याचा प्रत्यय दिला हे विशेष.
0 टिप्पण्या