Ticker

6/recent/ticker-posts

आज होणार बारावीचा निकाल जाहीर परीक्षार्थी, पालक व शिक्षकांमध्ये उत्सुकता

आज होणार बारावीचा निकाल जाहीर परीक्षार्थी, पालक व शिक्षकांमध्ये उत्सुकता


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून २५ हजार ९६७ विद्यार्थी बसले होते.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी पासून घेण्यात आल्या. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण २५ हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नियमित, खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. जिल्ह्यातील एकूण ८७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक तास अगोदर परीक्षा केंद्रात प्रवेश आला. परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होवू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी यांनी परीक्षा केंद्र व केंद्रांच्या बाहेरील १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला होता. दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर करण्यात येईल. त्यामुळे निकालाबाबत परीक्षार्थी, पालक व शिक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे.

या 👇 संकेत स्थळावर पाहू शकता निकाल 

बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालासोबतच विषयानुसार गुणांचा तपशीलही या संकेतस्थळांवर पाहता येईल. तसेच निकालाची प्रिंटही घेता येईल. mahresult. nic.in 

तसेच विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच त्यासंदर्भातील इतर माहिती किंवा आकडेवारी www. mahresult.nic.in या संकेतस्थळावरून मिळवता येईल.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या