Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.राजरत्न आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील बौध्द महासभेच्या वतीने बुद्ध जयंती निमित्त विविध कार्यक्रम

डॉ.राजरत्न आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील बौध्द महासभेच्या वतीने बुद्ध जयंती निमित्त विविध कार्यक्रम


अकोला- डॉ.राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील बौध्द महासभा अकोला जिल्हा शाखेच्या वतीने आज वैशाखी पौर्णिमा अर्थात तथागत गौतम बुद्ध जयंती , ज्ञानप्राप्ती निमित्ताने तसेच कोशाध्यक्ष प्रदीप धांडे यांच्या विशेष सहकार्याने त्यांचे वतीने स्थानिक अशोक वाटीका येथे बौध्द अनु्यायांसाठी खीरदान कार्यक्रम घेतला.


आज वैशाखी पौर्णिमा निमित्ताने अशोक वाटीका येथे बुद्ध जयंती निमित्ताने तथागत गौतम बुद्धा यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बौध्द उपासक, उपासिका यांना खीरदान केले. खीरदान कार्यक्रम प्रारंभा पूर्वी सामूहिक त्रिशरणं, पंचशील ग्रहण करून भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हाध्यक्ष डॉ अरुण चक्रनारायण, जिल्हाकार्याध्यक्ष देवीलाल तायडे, सुनील सिरसाट, लॉर्ड बुद्धा फॉउंडेशचे अध्यक्ष इरभान तायडे, महासचिव एम एम तायडे, महानगर अध्यक्ष सुनील सिरसाट,ऍड. चंद्रशील दंदी,यशवंत इंगोले, बाळासाहेब अंभोरे, सुनील तायडे, , राजू मोरे, दयाराम तायडे, महिला जिल्हाध्यक्षा राजकन्या सावळे, महानगर अध्यक्षा शोभाताई वानखडे, प्रदीप धांडे, जितेंद्र अहिर, मधुकर सिरसाट, महिला आघाडी अध्यक्षा किरण चक्रनारायण, गंगा गवई, रुख्मिणी इंगोले, कमल तायडे, वर्षा सोनोने, चंद्रकला तायडे, बबिता मोरे,मीनाक्षी तायडे, चंदा जवंजाळ, सह लॉर्ड बुद्धा फॉउंडेशन वंदना संघ ,आदींनी परिश्रम केले.

निर्मल ज्ञान बौद्ध विहार येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त खिर वाटप


अकोला तालुक्यातील ग्राम डोंगरगाव येथे जगाला शांती चा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने निर्मल ज्ञान बौद्ध विहार येथे नेहमी प्रमाणे सकाळी विहारात समस्त बुद्ध अनुयायींनी सामुहिक बुद्ध वंदना घेऊन त्रिशरण पंचशील ग्रहण करून समस्त डोंगरगाव येथील बुद्ध अनुयायांना खीर प्रसादाचे वाटप करण्यात आले.. यासाठी गावातली विशाखा महिला मंडळ व सिध्दार्थ युवक मंडळ यांनी परिश्रम घेतले...


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या