Ticker

6/recent/ticker-posts

जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष महायुतीचा विजय निश्चित - आ. सावरकर

जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष महायुतीचा विजय निश्चित - आ. सावरकर


अकोला 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 370 कलम रद्द करणारे जम्मू-काश्मीरमध्ये ओबीसी मागासवर्गीयांना न्याय मिळवून देणारे, प्रभू रामचंद्राचा भव्य मंदिर निर्माण करणाऱ्या, मातृ शक्तीचा सन्मान करणारा, योजनेचा लाभ सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणारा विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुती करण्यासाठी कार्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सरकार केंद्रात येणार असून राज्यात जनता जनार्दन खंबीरपणे पाठीशी उभे असून जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष महायुतीचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.


सतत चार दिवसापासून जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघात निरीक्षक म्हणून सर्वसामान्य जनतेशी संवाद पदाधिकारी कार्यकर्ता महायुतीचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करताना आमदार सावरकर यांनी राज्यातील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांचे सरकार सर्वांना सोबत घेऊन जलसिंचन शेतकरी एक रुपयात पीक विमा योजना देणारा सरकार असल्याचे सांगून राष्ट्रीय संघटन सरचिटणीस शिवप्रकाश जी यांच्या सानिध्यला प्राप्त होऊन संघटन कौशल्याचा लाभ आपल्याला मिळत आहे उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये राज्यांमध्ये यश प्राप्त करणारे व्यक्तिमत्त्वाचे विजयाचे मंत्र शिकण्यात मिळत असल्याचा आनंद व्यक्त केला भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री गिरीश महाजन प्रदेश उपाध्यक्ष चैन सुख संचेती, आमदार संजय कुटे, प्रदेश सरचिटणीस रवी अनास पुरे आमदार सुरेश मामा भोळे डॉक्टर राधेश्याम चौधरी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर उज्वलाताई बेंडाळे लोकसभा चुनाव प्रबंधन समिती संघटन मंत्री डॉक्टर राजेंद्र फडके, यांच्यासोबत सातत्याने चार दिवसापासून मतदार संघात आमदार सावरकर जनसंपर्क करत आहे यांच्यासोबत भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस माधव मानकर व इतर पदाधिकारी सोबत आहे. नामदार नितीन गडकरी तसेच इतर नेत्यांच्या होणाऱ्या सभेची पूर्वतयारीची माहिती घेऊन सभा यशस्वी चे मंत्र आमदार सावरकर यांनी कार्यकर्त्यांना सांगून निवडणूक जिंकणाऱ्या निर्धाराने कामाला लागण्यासाठी वाडप्रभात गाव बुथ प्रमुखांशी थेट संपर्क साधत आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या