कूलरच्या धक्क्याने चिमुकलीचा मृत्यू, शिवसेना वसाहत परिसरात दुखाचे वातावरण
अकोला :
शिवसेना वसाहत मन सुन्न करणारी घटना, रहिवासी माजी परिसरातील नगरसेवक अमोल गोगे यांची ७ वर्षीय मुलगी युक्ती घरात लावलेल्या कूलरजवळ खेळत असताना, या कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने युक्तीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९. ३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सविस्तर वृत्त असे की ७ वर्षीय मुलगी युक्ती ही घराजवळ खेळत असताना कूलरजवळ गेली. कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. युक्तीचे आईवडील व कुटुंबीय घरातच होते. मात्र, त्यांच्या लक्षात येईपर्यंत युक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. युक्तीला विजेचा धक्का लागल्याची माहिती मिळताच कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगताच, गोगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कूलरला असलेल्या बटनांची एक वायर कटून त्यामधील करंट कूलरच्या जाळीला लागला. संपूर्ण कूलरमधून विजेचा प्रवाह सुरू असतानाच युक्तीचा हात कूलरला लागला. यामुळे तिला जबर शॉक लागून तिचा मृत्यू झाला. अंतयात्रा 6 मे 2024 सकाळी 10.30 वाजता शिवसेना वसाहत येथील अमोलभाऊ गोगे ह्यांचे घरुन निघेल, असे नविन गोगे यांनी कळविले आहे. अमोलभाऊ गोगे ह्यांचे परीवारावर आलेल्या दुःखद प्रसंगातुन सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो, युक्तीच्या अपघाती मृत्यू ने संपूर्ण समाज मन हळहळले संपूर्ण गोगे कुटुंबातील सदस्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना शिवसेना वसाहत येथील नागरीकांनी केली आहे.
0 टिप्पण्या