Ticker

6/recent/ticker-posts

मतीमंद व दिव्यांग पीडितेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस दुहेरी जन्मठेप

मतीमंद व दिव्यांग पीडितेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस दुहेरी जन्मठेप


अकोट दिनांक ०८ मे २०२४ रोजी येथील वि. जिल्हा व सत्र तसेच विशेष न्यायाधीश श्री. चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांनी सत्र खटला क्र. ०८/२०२१ मधील आरोपी राजेश मनोहर पाठक वय ४० वर्ष रा. ढोमणपुरा, सोमवारवेस अकोट ता. अकोट जि. अकोला या आरोपींविरूध्द मतीमंद व दिव्यांग मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीला विविध कलमांतर्गत... १) ३७६ (२) (एल) या कलमांतर्गत गुन्हयाकरिता आरोपीस त्याच्या नैसर्गिक जीवनाच्या अंतापावेतो सश्रम जन्मठेपेच्या कारावासाची शिक्षा आणि रू. ५०,०००/- (पन्नास हजार रुपये फक्त) रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे. व दंड न भरल्यास सहा वर्षाच्या अधिकच्या कारावासाची शिक्षा भोगावयाची आहे. कारावासाच्या सर्व शिक्षा आरोपीने एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत.


२) भादंविच्या कलम ३७६ (२) (एन) या कलमांतर्गत शिक्षापात्र गुन्हयाकरिता आरोपीस नैसर्गिक जीवनाच्या अंतापावेतो सश्रम जन्मठेपेच्या कारावासाची शिक्षा आणि रू. ५०,०००/- (पन्नास हजार रूपये फक्त) रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा ठोठाविण्यात येत आहे. व द्रव्यदंड न भरलया आरोपीने सहा वर्षाचा अधिकचा कारावास भोगावयाचा आहे.

३) भादंविच्या ५०६ या कलमांतर्गत शिक्षा पात्र गुन्हयाकरिता आरोपीस ५ (पाच फक्त) वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि रूपये ५०००/- फक्त रुपयेच्या द्रव्यदंडाची शिक्षा व द्रव्यदंड न भरल्यास आरोपीने एक वर्ष अधिकच्या कारावासाची शिक्षा भोगावयाची आहे. आरोपीच्या प्राधान्याच्या कारावासाच्या शिक्षा त्याने संयुक्तपणे म्हणजे एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. मात्र द्रव्यदंड न भरल्यास भोगावयाच्या वैकल्पिक कारावासाच्या शिक्षा आरोपीने स्वतंत्रपणे म्हणजे एकानंतर दुसरी अशा रितीने भोगावयाच्या आहेत.


४) तसेच आरोपीने काहीएक द्रव्यदंड अपील कालावधीनंतर त्या द्रव्यदंडाची संपूर्ण रक्कम * पीडितेच्या हितासाठी वापरण्यासाठी तिच्या आई-वडीलास संयुक्त बँक खात्याद्वारा देण्यात यावी.

या प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी आहे की, नमूद प्रकरणात पीडितेची आई ही फिर्यादी असून, यांनी पो.स्टे. ला येवून जबाणी रिपोर्ट दिला की, ती तिचे पती, दोन मुलं व मुलगी असे एकत्र राहत असून, घरकाम करून कुटूंबाचा उर्दनिर्वाह चालवितात. पीडिता मुलगी जन्मताच मतीमंद व दिव्यांग असल्याने तिला थोडेफार चालता येते. पीडिता मुलगी हिला मार्च

महिन्यात खुप उलट्या होत होत्या. तसेच तिला मासीक पाळीपण आलेली नव्हती. त्यामुळे फिर्यादीने तिला दिनांक १७.०३.२०२० रोजी डॉक्टरांकडे दवाखान्यात नेले होते. व त्यावेळी तिची दवाखान्यामध्ये लघवीचे परिक्षण करण्यात आले. त्यावेळी सदरील पीडिता ही गर्भवती असल्याचे चाचणीमध्ये निष्पन्न झाले. त्यानंतर पीडितेला विश्वासात घेवून, तिला विचारपूर केली त्यावेळी तिने आरोपीने तिचे सोबत फिर्यादी व त्यांचे नातेवाईक घरी नसतांना वारंवार जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केल्याचे सांगितले. व त्यामुळे तिला गर्भधारणा झाल्याचे तिने सांगितले. अशा फिर्यादीच्या जबाणी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला.


विरूध्दचा गुन्हा सिध्द करण्याकरिता वरील प्रकरणामध्ये एकूण २२ साक्षीदारांच्या साक्षी या वि. न्यायालयात खटल्यामध्ये नोंदविल्या आहे. वरील प्रकरणामध्ये आरोपीविरूध्द कलम ३७६ (२) (एल), ३७६ (२) (एन), ५०६ भादंवि प्रमाणे गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीला वरील प्रमाणे शिक्षा सुनावली. शिक्षेसंबंधी सुनावणी दरम्यान वि. न्यायालयात सरकारी वकील पी.बी. सहारे यांनी युक्तीवाद केला की, आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून, आरोपीला शिक्षेमध्ये दया, बुध्दी दाखविल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी विनंती सरकारी वकीलांनी केली. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून वि. न्यायालयाने आरोपीला वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली. वरील प्रकरणात तपासी अंमलदार म्हणून धिरज डि. चव्हाण एपीआय अकोट शहर पोलीस स्टेशन अकोट यांनी तपास करून दोषारोपपत्र वि. न्यायालयात दाखल केले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ. प्रकाश वसंतराव चोशी ब. नं. १३५५ यांनी मोलाचे सहकार्य केले व साक्षीदारांना वि. न्यायालया समक्ष हजर करण्यास मदत केली


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या