Ticker

6/recent/ticker-posts

अकोला महानगरपालिका हददीतील गुठेवारी खरेदी विक्री चालू करा, मागणीसाठी उपनिबंधक कार्यालयात केले ठिय्या आंदोलन

अकोला महानगरपालिका हददीतील गुठेवारी खरेदी विक्री चालू करा, मागणीसाठी उपनिबंधक कार्यालयात केले ठिय्या आंदोलन


कार्यालयातील खरेदी विक्री व्यवहार झाले ठप्प


अकोला. तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा यांचे आदेश क्रमाक कक्षा-/प्र स (मह/पक्र 2110/ कारवी-2079/2023 अन्वये जिल्ह्यातील गुंठेवारी चे खरेदी विक्रीचेव्यवहार पूर्ण पणे ठप्प पडले असल्याने जिल्ह्यातील घरकुले मंजूरातीच्या प्रतीक्षेत आहेत.विशेष करून अकोला मनापा हद्दीतील घरकुल योजनेचे काम प्रभावीत झालेले आहेत. त्यामुळे गुंठे वरीचे खरेदी विक्री व्यवहार चालू करण्यात यावेत या मागणीसाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख राजेश मिश्रा नेतृत्वात उप निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.


तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सह. जिल्हा निबंधक अकोला दुय्यम निबरधक अकोला यानी यापुेढे गुंठेवारी क्षेत्राचे खरेदी-विक्री व्यवहार करताना संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी निर्मित केलेले अकृषिक आदेश, किंवा आदेशाच्या अंतर्गत मंजूर केलेला साक्षाकित नकाशा, प्रति भूखंड पाहुनच नियमाकृल खरेदी-विक्री केल्याबाबतचे व्यवहार करावैत. अकृषिक कोणत्याही आकारणी परिस्थितीत गुठेवारी आदेश, क्षेत्राबाबत बाबौंची पड़ताळणी केल्याशिवाय खरेदी- विक्री व्यवहार होणार नाही याबाबत कटाक्षाने दक्षता धेणेबाबत आदेशित केले आहे तसेच जोपर्यंत अकोला महानगरपालिके द्वारे गुठेवारी क्षेत्र नियमाकुल करण्यात येत असल्याबाबतचे येत नाही तोपर्यंत गुठेवारी पारित केलेले क्षेत्राचे आहे. खरेदी विक्री व्यवहार नोदविण्यास याद्वारे स्यगिती देण्यात आली आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रात जुने शहर तसेच हद्दवाढीनंतरचा भाग यामध्ये खूप जास्त प्रमाणात गुठेवारी चे प्लॉट आहेत. आपले माफत गुठेवारी प्रकरणाची खरेदी विक्री बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोर गरीब नागरिकाच्या भूखड खरेदी विक्री बद आहेत. त्यामुळ सर्व साधारण नगरिकाना आर्थिक भुर्दंड तसेच मानसिक जास सहन करावा लागत आहे. तसेच शासनाचा महानगरपालिकेचे आथिक नुकसान होत आहे. हे आर्थिक नुकसान वाचवीण्यासाठी त्वरित गुंठेवारीचे खरेदी विक्रीचे व्यवहार चालू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शहर अध्यक्ष राजेश मिश्रा,मंगेश काळे,तरुण बगैरे, माजी नगरसेवक,शरद तूरकर,गजानन चव्हाण, मंजुषा शेळके,योगेश गिते,नितीन मिश्रा, नितीन ताथोड पाटील, गजानन बोराळे, सीमाताई मोकळ कार, योगेश गवळी, सतीश नागदेवे, रवी मडा वी, सतीश वानेरे, सुनीता श्रीवास वर्षा पिसोडे, पूजा मालोकार,सह शेकडो शिवसेनेचे सैनिक उपस्थित होते. या आंदोलनामुळे उप निबंधक कार्यालयात सर्वच खरेदी विक्री चे व्यवहार ठप्प झाले होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या