Ticker

6/recent/ticker-posts

तोष्णीवाल लेआउट मध्ये द्वारका नगरीत राहणारे अनिल बजाज यांच्या घरी चोरी

तोष्णीवाल लेआउट मध्ये द्वारका नगरीत राहणारे अनिल बजाज यांच्या घरी चोरी


अकोला
अकोला शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. चोरीच्या घटनांमुळे अकोला शहरातील नागरिकांमध्ये भितिचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच अकोला शहरांमधील प्रतिष्ठित नागरिक राहत असलेल्या तोष्णीवाल लेआउट जवळील द्वारका नगरीमध्ये कोठारी डुप्लेक्स मध्ये राहत असलेले अनिल राजमल बजाज यांच्या घरी रात्री दोन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी व लोक तोडून घरामध्ये प्रवेश करून दाग दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. बजाज कुटुंब लंडन येथे आपल्या नातेवाईकाच्या घरी गेले असता पाच ते सहा दिवसापासून घर बंद असल्याचे चोरट्यांनी लक्ष केंद्रित करून घरातील वस्तूंवर आपला हात साफ केला. शेजारी राहत असलेल्यांच्या लक्षात आल्यानंतर अनिल बजाज यांचे नातेवाईक नीरज बजाज यांना फोन द्वारे माहिती कळविली.


 यावेळी सिव्हील लाईन पोलीस स्टेशन येथे निरज बजाज यांनी तक्रार दाखल केली असून सिव्हील लाईन पोलीस स्टेशनचा ताफा स्वान पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. यावेळी घरमालक अनिल बजाज कुटुंब घरी नसल्यामुळे अद्याप पर्यंत कोणत्या वस्तू व किती रुपये चोरीला गेला हे समजू शकले नाही. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या