Ticker

6/recent/ticker-posts

आगरकर विद्यालय जवळ शॉर्ट सर्किट मुळे तडपत्या उन्हात झाडांना लागली आग

आगरकर विद्यालय जवळ शॉर्ट सर्किट मुळे तडपत्या उन्हात झाडांना लागली आग 


अकोला शहरातील आगरकर विद्यालय हे रेल्वे स्टेशन रोड कडे जाणाऱ्या मार्गावर न्यायालय ला लागून आहे.. मोठ्या प्रमाणात कचरा व झाडे झुडपे आहेत. बाजूलाच अंडरग्राउंड वायरिंग गेलेली असून अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागून पेट घेतला. दरम्यान अग्निशामक विभागाला परिसरातील नागरिकांनी फोन द्वारे सांगितल्यानंतर अग्निशामन विभाग कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविले. बाजूला न्यायालय असल्यामुळे नागरिक भयभीत झाले. आगीने जास्त रोद्र रूप धारण केले असते तर जिल्हा न्यायालय मधील कागदपत्रे फाईल जळण्याची भीती निर्माण झाली होती परंतु अग्निशामन विभागाने आगीवर नियंत्रण आणल्यामुळे आगीपासून सुटका मिळाली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या