Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस दलातील उत्कृष्ट कामगीरी करणारे ४ पैरवी पोलीस अंमलदार सत्कार

पोलीस दलातील उत्कृष्ट कामगीरी करणारे ४ पैरवी पोलीस अंमलदार सत्कार



विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परीक्षेत्र अमरावती यांनी अकोला पोलीस दलातील उत्कृष्ट कामगीरी करणारे ४ पैरवी पोलीस अंमलदार यांना न्यायालयीन खटल्यामध्ये १० वर्ष व त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या दोषसिदधी साठी प्रशस्तीपत्र देवुन सन्मानीत केले....


आज दिनांक २५.०५.२०२४ रोजी सकाळी ११ वा विजय हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय येथे, माननीय श्री रामनाथ पोकळे विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र, अमरावती यांच्या प्रमुख उपस्थिती मधे गुन्हे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकी करीता मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, मा. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच प्रभारी शाखा प्रमुख बैठकी करिता उपस्थित होते.

सदर गुन्हे आढावा बैठकी मध्ये शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे, मालमत्ता संबंधीचे गुन्हे उकल, तसेच प्रतिबंध कार्यवाही, गुन्हे दोषसिद्धी चे प्रमाण, त्याच प्रमाणे ऑनलाईन फ्रॉड, सामाजिक उपक्रम तसेच आगामी निवडणुक मतमोजणी, कायदा व सुव्यवस्था बाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. अकोला जिल्हयात विविध ठिकाणी नुकतेच मा. न्यायालयाकडुन आरोपींना कठोर शिक्षा देणारी दोषसिदधी झाली त्याबददल समाधान व्यक्त केले.


कोर्ट पैरवी म्हणुन कामकाज पाहणारे पोलीस अंमलदार सफौ सतीश हाडोळे, पोस्टे बोरगाव अपनं २०८/१७ क. ३७६ भादवी मध्ये १० वर्ष कारावसाची शिक्षा, ३००० रू दंड, पोहवा विजय सोळंके, पोस्टे हिवरखेड अपनं ६३/१५ क.३०२ भादवी मध्ये आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, १ लाख ८० हजार रू. दंड न भरल्सास ५ वर्ष अधीक कारावासाची शिक्षा, पोहवा प्रकाश जोशी, पोस्टे अकोट शहर १. अपनं १७८/२०२० क. ३७६ भादवी दुहेरि जन्मठेप व दिडलाख रू. द्रव्यदंड ची शिक्षा. २. अपनं ४४२/१९ क. ३०२ भादवी मध्ये दोषी ठरवुन १०वर्ष करावासाची शिक्षा, मपोहवा रेखा हातोलकर, पोस्टे बाळापुर अपनं ८०७/२०२० क. ३०२ भादवी जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रूपये दंड करण्यात आला. या गुन्हयात उत्कृष्ट कामगिरी बाबत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या