सावरगाव येथील मुलीचं घवघवीत यश, गावकऱ्यांकडून सर्वत्र कौतुकाची थाप
पातुर : तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील सावरगाव येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुणांनी बाजी मारत घवघवीत यश मिळविले आहे. सावरगाव येथील नागरिक विजय कांबळे यांनी आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून तालुकास्तरावर अतिशय काटकसरीने संघर्षमय जीवन जगत मुलींना शिक्षण देत आहे. पातूर येथील वसंतराव नाईक विद्यालय येथे शिकत असलेली सावरगाव येथील श्रुती विजय कांबळे ९४.२० उत्कृष्ट गुणांनी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन विशेष प्राविण्य श्रेणीत प्राप्त केली आहे. अतिशय जिद्द चिकाटी व मेहनतीने शिकत असलेली ही विद्यार्थिनी आपल्या आई-वडिलांचे व गावाचे नावलवकिक करीत आहे. शाळेचे संस्थापक अध्यक्ष व गुरुजन मंडळी गावकरी यांच्याकडून भरभरून कौतुक करण्यात आले आहे. या विद्यार्थिनींनी आपल्या दहावीच्या परीक्षेत मिळविलेले घवघवीत यशाचे श्रेय आई-वडील व गुरुजनांना दिले आहे.
बाबासाहेब नाईक विद्यालयाची उत्तुंग भरारी
प्रतिनिधी नासीर शेख
सावरगाव विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजला जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक बाबासाहेब नाईक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली असून परीक्षेला नेत्र दीपक यश संपादन केले. शाळेतील एकूण २६ विद्यार्थ्यापैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल ९२.३०% लागला आहे कुमारी सोनाली रामदास आडे हिने सर्वाधिक ८९.४०% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे कुमारी भाग्यश्री अरविंद चव्हाण ८५.८०% कुमारी आचल श्रीकृष्ण रामचौरे ८५.४०% कुमारी नेहा हरिदास रामचौरे ८४.४०% कुमारी पूजा अनिल बलक ८२.६०टक्के रोहित विनोद चव्हाण ८१.४०% अशा एकूण १२ विद्यार्थ्यांनी प्राविण्यश्रेणीत तर नऊ प्रथम श्रेणीत आणि तीन द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले विद्यार्थ्यांनी या यशाकरिता नियमित होणाऱ्या तासिका तसेच शिक्षक व शिक्षिका यांनी प्रत्येक विषयाच्या कार्यशाळेत केलेले अचूक मार्गदर्शन सराव प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या वार्षिक नियोजन इत्यादी बाबी महत्त्वपूर्ण ठरल्या विद्यार्थ्यांच्या या नेत्र दीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री रामसिंग जी जाधव साहेब यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राठोड मॅडम,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कौतुक केले.
0 टिप्पण्या