Ticker

6/recent/ticker-posts

मनुस्मृतीचे समर्थन करनाऱ्या अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा विरोध

मनुस्मृतीचे समर्थन करनाऱ्या अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा विरोध


सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 प्रतिनिधी- राहुल खाडे 
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य,यांनी मनुस्मृतीचे समर्थन करणारा अभ्यासक्रम आराखडा जाहीर केलेला आहे.आणि अभिप्रायासाठी जाहीर केलेला SCF-SE राज्य अभ्यासक्रम आराखडा 336 पानांचा आहे.तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक,बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी हा आराखडा बनवला आहे. त्यावर अभिप्राय मागवण्यात आला आहे, तो 03 जून 2024 पर्यंत कार्यालयात सादर करायचा आहे. तो कालावधी 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढवावा या साठी सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्ह्याच्या वतिने दि. २८ मे २०२४ रोजी अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन,राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य,यांनी मनुस्मृतीचे समर्थन करणारा अभ्यासक्रम आराखडा जाहीर केलेला आहे .


त्याचा निषेध करून, त्या विरोधात दिनांक 28 मे 2024 रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलना तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे,यावेळी जिल्हाध्यक्ष इंजि.धिरज इंगळे, उपाध्यक्ष अ‍ॅड.श्रीकांत वाहुरवाघ,आदित्य बावनगड़े,गौरव वाळूकार जिल्हा मिडिया प्रमुख प्रथमेश गोपनारायण, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख अक्षय डोंगरे,सचिव राहुल खाड़े, सदस्य अंकित इंगळे,अभिषेक रोकडे,आयुष सामदूरे,अभय इंगळे, सौरभ तायडे, पियूष शिवधारकर व RLT कॉलेज शाखा प्रमुख आदित्य शिरसाठ, COETA कॉलेज शाखा प्रमुख पियूष हेरोळे, आदि विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या