Ticker

6/recent/ticker-posts

अकोला जिल्हयातील बी बियाण्यांच्या तुडवडा भासवून बळीराजाची होणारी लूट थांबवावी

अकोला जिल्हयातील बी बियाण्यांच्या तुडवडा भासवून बळीराजाची होणारी लूट थांबवावी


 मानसुनची चाहूल लागल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागत करून बी बियाण्यासाठी लगबग सुरू केली आहे यावेळी मान्सून लवकर येणार म्हणून विविध जातीचे बियाणे वेळेच्या आधी विकत घ्यावी व जेणेकरून पेरणीच्या वेळेस भाग दोड होणार नाही हा त्याच्या मागील हेतू परंतु प्रशासनाने २६ एप्रिल मतदान संपल्यानंतर लगेच कृषी सेवा केंद्र कंपन्या व जनप्रतिनिधी कृषी अधिकारी यांची बैठक बोलावून शासन कार्यतत्पर असल्याचे भासविले परंतु वास्तविकता ही आहे की अजित १५५ व यासारखी अनेक बियाणे ज्याची मागणी मोठया प्रमाणात आहे अश्या बियाणे चा कृत्रिम तुटवडा भासवून अवाच्या सव्वा भावांमध्ये अकोला अकोट व इतर विकल्या जात आहे सोयाबीन शेतकऱ्याकडून घेतांना क्किंटलला मध्ये ४२०० रुपयेचां भाव मिळतो परंतु बियाणे घेतांना २५ किलो साठी ४५०० रुपये मोजावी लागतात यामध्ये मोठी तफावत दिसून येते हे कमी की काय कृषी सेवा केंद्राच्या समोर उष्णतेची लाट असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी रांगा लावत आहेत काही शेतकरी अमरावती यवतमाळ नागपूर या ठिकाणाहून बियाणे खरेदीचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे नुकत्याच गावंडे नामक शेतकऱ्यांचा बळी गेला आहे या सर्व गोष्टीचा प्रशासनाला काही देणे घेणे नाही असेच दिसून येते आज शेतकऱ्यांकडे खूप कमी कालावधी असून या कालावधीमध्ये त्यांना पेरणीसाठी भाग-दोड करावी लागणार आहे करीता कुत्रिम टंचाई भासवून तेच बियाणे दुप्पट तिप्पट भाव आकारून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे त्यामुळे रोज शेतकरी,सेवा केंद्राचे मालक, संचालक, प्रशासकीय अधिकारी यांचे रोजच भांडणे होत आहेत करीता शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही याची दखल शासनाने घेणे गरजेचे आहे तसेच बियाणांची टंचाई भासवून शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या केंद्रांचे परवाने रद्द करावा संबंधित कृषी विभागातील अधिकारी यांचेवर त्वरीत कारवाई करावी अन्यथा शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून त्याचे पडसाद नजीकच्या काळामध्ये आंदोलनाच्या रूपात निश्चितच पहावयास मिळतील सोबत भाजपाचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होतील. शेतकरी हितचिंतक 
डॉ अशोक ओळंबे, माजी आ नारायराव गव्हाणकर, मा आ वसंतराव खोटरे, मनोहर हरणे, अक्षय लहाने डॉ अरविंद लांडे, एकनाथ ताथोड, प्रा रामरतन पूंडकर संदीप कवडे धनंजय ढोक, संतोष घुगे, अशोक लोनाग्रे, चंदू घाटोळे आदींनी नियोजनाद्वारे कळविले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या