अरुण व्होरा अपहरण प्रकरण, सुखरूप परतले घरी
अकोला - रामदास पेठ पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रायली जीन कॉम्प्लेक्समधील आपल्या दुकानातून व्यापारी अरुण व्होरा हे काम संपवून मोपेड वाहनात पोहोचले असता, एका मारुती व्हॅनमधील अज्ञात आरोपींनी त्यांचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . यानंतर पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू होता. पोलिस प्रशासनाकडून 25 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले.
अखेर रात्री साडे बाराच्या सुमारास ते घरी सुखरुप पोहोचले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑटो चालकाने कान्हेरी सरफ येथून आणल्याचीही प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यांचे कपडे मातीने भरल्याची भरलेली होती. रामदास पेठ पोलीस प्रशासन यापरकरणी अधिक तपास करत आहे. वोरा यांच्याशी विचारपुस सुरु कसुन आरोपी आणि वहनाचा पोलीस शोध घेत आहेत. या संपूर्ण घटनेचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे, अशी महीती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
0 टिप्पण्या