व्यवसायिकाचे अपहरण, आरोपीना जेल बंद करा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन
अकोला शहरातील रायलीजीन भागातून एका व्यावसायिकाचे शस्त्राच्या धाकावर चारचाकीमध्ये डांबून तीन ते चार अज्ञात आरोपींनी अपहरण केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या सिनेस्टाईल घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. अरुण वोरा असे अपहरण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. अपहृत व्यावसायिकाचा शोध गेल्या दोन दिवसांपासून लागलेला नाही. अखेर पोलिसांनी माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस बुधवारी जाहीर केले. पोलिसांपुढे प्रकरणाचा तपास लावण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. दिवसा ढवळ्या अश्या घटना घडत असतानाही पोलिसांना तपासात यश मिळत नाही. पोलिसांनी आरोपीना लवकरात लवकर जेल बंद करा अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांच्यासोबत चर्चा करून आणि रामदास पेठ पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
अकोल्यामध्ये बिहार सारखी घटना घडलेली आहे.महाराष्ट्राचा बिहार तर होत नाही.अशी शंका 13 मे रात्री घडलेली अरुण वोरा या व्यापाराच्या अपहरणाच्या घटने नंतर हे प्रश्न अकोलेकरांना पडला आहे. हे घटना गांभीर्याने लक्षात घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अकोला पक्षाच्या वतीने आज दि: 15 मई रोजी शिवसेना शहर संघटक तरुण बगेरे,शरद तूरकर,युवासेना शहर प्रमुख नितीन मिश्रा,संजय अग्रवाल,बबलू उके,रोशन राज, देवा गावंडे,अक्षय नागापुरे,आदी शिवसेना शहर पदाधिकारी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांच्या सोबत या गंभीर मुदय्या वर चर्चा करुन रामदास पेठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन आरोपीना लवकरात लवकर जेल बंद कारणात यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने कारणात आली.
पोलीसांनी माहिती देणाऱ्यास
25 हजाराचे बक्षीस केले जाहीर
अपहरण झालेले व्यक्ती नामे अरुणकुमार मगनलाल वोरा रा. राधे नगर कलेक्टर ऑफीस जवळ, अकोला यांच्या शोध बाबत पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला अंतर्गत येणारे चार जिन दगडी पुलाजवळील काचेच्या बॉटल विकत घेणारे व्यापारी नामे अरुणकुमार मगनलाल वोरा रा. राधे नगर कलेक्टर ऑफीस जवळ, अकोला हे दिनांक १३ मे २०२४ रोजी रात्री अंदाजे ०९.०० ते ०९.३० वा. वे सुमारास त्यांचे वार जिन दगडी पुल जवळील गोडावुन बंद करून घरी जाण्यासाठी त्यांची मोपेड गाडी उभी करण्याचे ठिकाणी गेले असता त्यांना २ ते ३ अनोळखी ईसमांनी जबरदस्तीने ओढत नेवुन एक जुनी पांढ-या रंगाचे कार मध्ये जबरदस्ती कोबुन घेवुन गेले आहेत.
अरुणकुमार मगनलाल वोरा यांचे वर्णनः-
त्यांनी अंगात हिरवा आणि पांढ-या रंगाच्या पटटया असलेले टि शर्ट व क्रिम रंगाची पॅन्ट परीधान केलेली होती त्यांची उंची-०५ फुट ०८ इंच, वर्ण-गोरा व शरिरबाधा मजबुत आहे.
गाडीचे वर्णनः- एक जुनी पांढ-या रंगाची मारोती ८००/अल्टो/झेन कार
वर नमुद वर्णनाच्या व्यक्ती बाबत जे व्यक्ती पोलीसांना माहिती देतील त्यांना मा. पोलीस अधिक्षक साहेब अकोला यांचे मान्यतेने २५,००० रूपयाचे बक्षीस देण्यात येईल तसेच त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या