"जीसके साथ राम उसका बडा नाम" बनेगे 'उसीकेही बिघडे काम' _डॉ अशोक ओळंबे
अकोला_स्थानिक शिवनगर येथील गजानन महाराज समाज मंदिरामध्ये श्री राम नवमी सामाजिक उत्सव समिती शिवनगर यांचे वतीने ९ एप्रिल गुढीपाडवा ते १७ एप्रिल रामनवमी "सामाजिक सप्ताहlचे" आयोजन यश देशमुख व सहकारी यांच्या नियोजनात करण्यात आले असुन १४ एप्रिल भारत रत्न घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १३३ व्या जयंती निमित्त भव्य रोग निदान व मोफत औषधी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये प्रसिद्ध हृदयरोग व जनरल फिजिशियन डॉ पीयूष भिसे,हृदय छाती व डायबिटीस तज्ञ डॉ अंकुश तोष्णीवाल चर्म रोग तज्ञ डॉ सौ शिवाणी तातीया दंतरोगतज्ञ डॉ सौ स्मिता शाह अस्थिरोग तज्ञ डॉ प्रकाश मेटांगे नेत्ररोग तज्ञ डॉ पंकज थोरात यांचे उपस्थितीमध्ये ५४० रुग्णांची तपासणी करून औषध उपचार करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा नेते ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव डॉ अशोक ओळंबे होते
कार्यक्रमाचे संचालन यश देशमुख,प्रास्ताविक शिवसेना नेते रवी देशमाने यांनी उपस्थित डॉक्टर्स व उपस्थितांचे आभार राजू बुंदेले यांनी मानले.यावेळी यश देशमुख करीत असलेल्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक डॉ अशोक ओळंबे यांनी करून श्रीरामाचे आशीर्वाद यश सोबत असल्याने
"जिसके साथ श्री राम उसका बडा नाम" असल्याचे सांगितले. शिबिर यशस्वी श्री रामनवमी सामजीक समिती अध्यक्ष यश मुकेशराव देशमुख, राजू बुंदेले, रवी देशमाने, कमलेश भरणे , निलेश वानखडे, विशाल मुधोळकर, शैलेश फूलकर, नवल कवळे, गजानन देशमुख,शुभम बेंदरकर, निखील बोरकर, संकेत जगताप, दिपक जैस्वाल, महेश मुळतकर, जय देशमुख, वैभव वैद्य, शुभम जामोदे, रोहित बुंदेले, नागेश लेडस्कार, शंकर पारेकर यांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या