Ticker

6/recent/ticker-posts

प.पू श्री.रामपाल महाराज यांच्या आदेशानुसार अनुप संजय धोत्रे यांना दिला पाठिंबा

प.पू श्री.रामपाल महाराज यांच्या आदेशानुसार अनुप संजय धोत्रे यांना दिला पाठिंबा


मुनिंद्र धर्मादाय ट्रस्ट हरियाणा यांच्या अकोला जिल्ह्यातील अनुयायांनी राष्ट्र हितासाठी प.पू श्री.रामपाल महाराज यांच्या आदेशानुसार भाजप व महायुतीचे उमेदवार अनुप संजय धोत्रे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.


धर्म कार्यात सेवा कार्यात सक्रिय असणारे मुनिंद्र ट्रस्ट कायमच समाजाच्या सेवेत रुजू असलेले संघटन आहे पूजनीय रामपाल महाराज यांच्या मार्गदर्शनात गरजुंची सेवा आणि धर्म कार्य करत राष्ट्र हित जोपासत या देशाची धार्मिक परंपरा अबाधित राखण्याचे काम या ट्रस्ट च्यावतीने होत असते.


आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपला भारत देश हा बलशाली राष्ट्र म्हणून भविष्यात निर्माण व्हावा आणि पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या २०४७ च्या विकसित भारत समृध्द भारत संकल्पाला समोर ठेवून मुनिंद्र धर्मदाय ट्रस्ट तर्फे भाजप महायुतीचे उमेदवार अनुप संजय धोत्रे याना पाठिंबा देत बहुमताने निवडून आण्यासाठी कार्यरत राहू असे अभिवचन यावेळी अकोला येथील अनुयायांनी दिले. यावेळी मुनिंद्र धर्मदाय ट्रस्ट परिवाराचे मधुकर दास डिडोळकर,देवेंद्र भोजापुरे,रामदास फाटे,गणेश फाटे,संतोष वानखडे, दीपक कोहर,दिगंबर मुंडाले,विजय जावळे,नंदकिशोर गुजर, पर्वतदास पदमने,गोपाळ शेळके व इतर सदस्य माता भगिनी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या