भारतीय संस्कृतीसाठी लाजिरवाणी घटना, आजोबाकडून नातीवर अत्याचार
अकोला जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. भारतीय संस्कृतीसाठी लाजिरवाणी घटना असुन, आजोबाकडून नातीवर अत्याचार आले आहे. आजोबानं १७ वर्षाच्या नातीलाच वासनेची शिकार बनवलं आहे. चुलत आजोबाने नातीवर सलग अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या वयाच्या साडे १७ वर्षांपासून चुलत आजोबाकडून ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार करण्यात येत होता. या पीडित मुलीला शेजारच्या महिलेने देखील ब्लॅकमेल करत एका तरुणांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायला भाग पाडलं. या धक्कादायक प्रकारामुळे मुलगी गरोदर राहिली. सद्यस्थितीत पीडित मुलीचे वय १८ असून ती ९ महिन्याची गरोदर आहे. सदर घटने प्रकरणी खदान पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपींचा शोध घेत आहे.
0 टिप्पण्या