Ticker

6/recent/ticker-posts

किसन जाधव यांच्या परिवाराचे अंजलीताई कडून सांत्वन

किसन जाधव यांच्या परिवाराचे अंजलीताई कडून सांत्वन


अकोला.. दत्ताळा येथील पाथरवट समाजाचे किसन जाधव यांचा नुकताच मृत्यू झाला. या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. या मृत्यूप्रकरणी किसन जाधव यांच्या परिवाराला संशय असल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आणि या प्रकरणाची चौकशी करून खूनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. 

           सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे 

वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी उपोषणकर्त्याच्या मंडपाला भेट दिली आणि त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी होऊन, तुम्हाला न्याय मिळेल यासाठी वंचित बहुजन आघाडी पूर्ण प्रयत्न करेल असे आश्वासन अंजलीताई आंबेडकर यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे दत्ताळा येथील सरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होत


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या