वाशिम बायपास चौकात शिवशाही बसचा टायर फुटला सुदैवाने जिवितहानी नाही
नादुरुस्त व भंगार बस रस्त्यावर धाऊ नका या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी विभाग नियंत्रक यांना निवेदन देऊन तक्रार केली होती तरीही अश्या भंगार बसेस अकोल्यात रोजच धावत असुन आज सकाळी ८ वाजता वाशिम बायपास चौक येथे एसटी महामंडळाची बस शिवशाही क्रमांक MH06 BW 4329 या गाडीचा टायर फुटला सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही सदर शिवशाही बस ही ब्रेक डाऊन जालना टू अकोला अशी प्रवासी घेऊन धावत होती परंतु वाशिम बायपास चौक येथे या शिवशाही बसचा ड्राइवर साईडचा मागचा टायर फुटला त्यामुळे प्रवास्याना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. सदर बस मधील प्रवाश्यांना दुसऱ्या बस मध्ये बसऊन बस स्टॅण्ड वर सोडण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे या बस मध्ये टायर बदलण्यासाठी जॅक व टायर बदलण्यासाठी लागणारे साहित्य सुध्दा नव्हते. चालक व वाहक दुसऱ्या बस मध्ये बसून बस स्टॅण्ड वर आले जॅक व साहित्य घेऊन वाशिम बायपास चौकात टायर बदली करण्यासाठी पोहचून टायर बदली केला व बस बस स्टॅण्ड कडे मार्गस्थ केली. तरीही ह्या भंगार व नादुरुस्त बसेस मुळे जर अपघात होऊन कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली तर एस टी महामंडळाच्या संबंधित अधिकारी यांच्या वर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी केली जाणार असून मागणी मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी केली आहे
सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे...
0 टिप्पण्या