बांधकाम क्षेत्रातील कामगारांचा महामेळावा आज
अकोला. जागतिक कामगार दिन *बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघ* जिल्हा शाखा अकोला च्या वतीने या महामेळाव्याचे आयोजन स्थानिक सिद्धार्थ हॉल राजकमल चौक कृषी उत्पन्न बाजार समिती रोड अकोला येथे करण्यात आलेले आहे.
तरी खऱ्या कष्टकरी बांधकाम कामगारांनी या मेळाव्यामध्ये येऊन कामगार अधिकारी प्रशासनाचे अधिकारी कामगार संघटनेचे प्रतिनिधी बांधकाम व्यवसायिक इंजिनियर बिल्डर या सर्वांना एका मंचावर आणून कामगार आणि विचार पिठावर संवाद साधून कामगारांच्या समस्यावर निराकरण करणे हे ध्येय संघटनेचे आहे व हा महामेळावा कष्टकरी कामगार लोहार सुतार सेंट्रींग गवंडी फेब्रिकेशन इलेक्ट्रिशन प्लंम्बर टाइल्स वाले आणि इलेक्ट्रिकल काम तसेच घराला सुंदर रूप देणारे कलरिंग चे काम विविध क्षेत्रातील बांधकाम कामगारांना "महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या योजना व त्या खऱ्याच कामगारांना मिळतात का हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यासाठी "बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघ" ही संघटना श्रमिक अधिनियम अंतर्गत रजिस्टर असून ट्रेड युनियन मान्यता प्राप्त संघटना आहे. खऱ्या कामगारापर्यंत जाऊन योजनांचा प्रचार व प्रसार करणे होय, कल्याणकारी मंडळाच्या तिजोरी मध्ये आज तारखेला 25000 कोटी रुपये पेक्षा जास्त निधी जमा झालेला आहे तो कामगारावर खर्च होणे गरजेचे आहे यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे व नोंदणी करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून मार्गदर्शने शिबिरे आयोजित केली जातात व शासनाने सुद्धा नोंदणीची प्रक्रिया सोपी केलेली आहे परंतु ऑनलाईन पद्धतीमध्ये दिलेले काम सुद्धा सहा सहा महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ लागत असल्यामुळे त्यामधून खरा कामगार हा त्रास सहन करावा लागत आहे यावर इतर बाबीसाठी या मेळाव्यामध्ये मंथन होणार आहे व काही ठराव सुद्धा पारित करण्यात येणार आहेत तसेच संघटनेचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे , सोबतच ज्या कामगारांनी आयुष्यामध्ये काबाडकष्ट करून आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देऊन मोठे केले नोकरदार बनवले अशा गुणवंत कामगार आई-वडिलांचा सत्कार सुद्धा या मेळाव्यात घेण्यात येणार आहे .पदवीधर मतदार संघाच्या धरतीवर कामगार मतदार संघ सुद्धा होणे गरजेचे आहे असा ठराव या ठिकाणी घेण्यात येणार आहे ,कामगारांच्या प्रतिनिधी कामगार मंडळावर घेण्यात यावे ,वय वर्ष ६० झालेल्या कामगारांना दहा हजार रुपये मासिक निवृत्ती लाभ पुर्ती देण्यात यावे ,प्रत्येक नोंदणीकृत कामगारांना अटल बांधकाम योजनेचे अर्ज हे जिल्हा कार्यालयामध्ये ऑफलाईन भरून घेण्यात यावे , मुलीच्या लग्नाचा जो लाभ आहे हा दोन मुलीसाठी देण्यात यावा हा सुद्धा ठरव घेण्यात येणार. वरील ठराव एकमताने पारित करण्यासाठी आपण या जागतिक कामगार दिन एक मे २०२४ रोजी सिद्धार्थ हॉल (स्वर्गीय रत्नपाल महाजन परिसर) राजकमल चौक कृषी उत्पन्न बाजार समिती रोड अकोला येथे सकाळी ११: वाजता उपस्थित राहावे. Asei aavahan बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघ जिल्हा शाखा तालुका शाखा ग्राम शाखा महानगर शाखा व पदाधिकारी अकोला जिल्हा



0 टिप्पण्या