माना येथे वरली मटका जुगारावर धाड, स्थानिक गुन्हे शाखा यांची धडक कारवाई.
मुर्तीजापुर तालुक्यातील माना येथे अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वरली मटका जुगार अड्ड्यावर अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दिनांक 29 फेब्रुवारी रोजी धाड टाकून बारा जणांवर कारवाई केली. हकीकत अशी की माना येथे अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वरली मटका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दिनांक 29 एप्रिल रोजी सापळा रचून बारा जणांना अटक केली.
त्यातील काहीजण वरली मटका जुगारावर रोजंदारीत मालकाकडून कामावर होते. व काहीजण वरली लावण्यासाठी दुकानात आले होते. मात्र पोलीस प्रशासन हे मुख्य मालकाला सोडून रोजंदारीत कामावर असलेल्या बेरोजगारांना पकडून आपले कर्तुत्व प्रशासनासमोर सिद्ध करीत असल्याचे जनसामान्यात चर्चा आहे. दुपारी तीन वाजता वरली मटका सुरू असताना दादाराव नथुजी गजभिये वय 68 वर्ष, शरद प्रल्हाद कोकणे वय 42 वर्षे, विनोद रामभाऊ सोळंके वय 45 वर्ष, संघपाल पुंडलिक चक्रे वय 39 वर्ष, सुनील मनोहर दिन्डोकार वय 51 वर्ष, युवराज गुलाब तायडे, विनोद प्रभुदास मोहोळ, भास्कर मुरलीधर निमकर, शरद ओंकार गायकवाड, रामेश्वर गोविंदराव साळुंखे, यांना वरली मटका लिहित असताना अटक केली. यां कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष शिंदे यांच्यासह पथकाचे कर्मचारी हे सहभागी होते. पुढील तपास माना येथील ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजनाथ धुळे हे करीत आहे.
0 टिप्पण्या