Ticker

6/recent/ticker-posts

युवकाचा कारच्या धडकेत मृत्यू बाळापुर अकोला मार्गवरील घटना

खेट्री येथील युवकाचा कारच्या धडकेत मृत्यू बाळापुर अकोला मार्गवरील घटना

प्रतिनिधी नासीर शेख 
पातूर : पातुर तालुक्यातील खेट्री येथील युवकाचा बाळापूर अकोला मार्गावरील कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. ३ एप्रिल रोजीच्या दुपारी घडली आहे. गोपाल मेसरे ३७ असे मृतकाचे नाव आहे. मृतक गोपाल मेसरे बाळापुरहुन अकोला कडे एम एच ३० व्हाय ८०९० क्रमांकाच्या दुचाकीने अकोला कडे जात असताना अकोल्याहून बाळापुर कडे येणारी एम एच १२ जी के ४०६२ क्रमांकाच्या कारने जबर धडक दिल्याने गोपाल मेसरे हा गंभीर झाला, काही लोकांनी त्याला गंभीर अवस्थेत ऑटोने अकोला येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, घटनेची माहिती मिळताच बाळापुर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि दुचाकी व कार पोलीस स्टेशनमध्ये जमा केले असून, पुढील तपास बाळापुर पोलीस करीत आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या