पुढील 24 तासात वादळासह जोरदार पाऊस, हवामान विभागाकडून हायअलर्ट
अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. मात्र अजूनही राज्यातील अवकाळी पावसाचं सकंट टळलेलं नाहीये. आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात प्रति तास 30-40 किमी वेगाने वारे वाहन्याची शक्यता आहे.
राज्यातील काही भागात गारपिटीचा देखील अंदाज आहे, गारपीट झाल्यास त्याचा मोठा फटका हा पुन्हा एकदा फळबाग आणि पिकांना बसू शकतो. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात पाऊस सुरुच आहे. पश्चिम महाराष्ट्रात मात्र आकाश मुख्यत: निरभ्र राहणार असून, हवमान कोरड राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या काळात मुंबईचं कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
0 टिप्पण्या