Ticker

6/recent/ticker-posts

त्या आरोपीचा मृत्यू; पीएसआय सह दोघे निलंबित ! पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची कारवाई

त्या आरोपीचा मृत्यू; पीएसआय सह दोघे निलंबित ! पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची कारवाई


अकोला अकोट शहर पोलिस स्टेशनअंतर्गत एका गुन्ह्यात संशयीत आरोपीस पोलिसांनी मारहाण केली की,त्याचा शेवटी उपचारादरम्यान मृत्यू झाला! या प्रकरणाची तक्रार थेट अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्याकडे करण्यात आली. त्यानुसार प्रकरणाच्या चौकशी नंतर पोलिस अधिक्षक बच्चनसिंह यांच्या आदेशान्वये पोलीस उप निरिक्षक राजेश जवरे व पोलीस हेड कॉस्टेबल चंद्रप्रकाश सोळंके यांना निलंबीत करण्यात आले आहे.या मारहाण प्रकरण मध्ये 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अकोट तालुक्यातील सुकळी गावातील एका संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये सदर संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर चौकशी समिती गठित करण्यात आली. त्यानुषंगाने पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पोलिस उपनिरीक्षक व एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची कारवाई केली.


अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील संशयित आरोपी गोवर्धन हरमकार याला अकोट ग्रामीण पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. त्याला तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचा आरोप आहे. मृतक गोवर्धनचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एका गुन्ह्याच्या आरोपाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश जावरे आणि इतर तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी १५ जानेवारी रोजी त्यांचा पुतण्या गोवर्धन याला अटक केली. त्यामुळे पोलिसांनी मृतक गोवर्धनसह तक्रारदार सुखदेव हरमकार यांनाही १६ जानेवारी रोजी ताब्यात घेतले. या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी अकोल्यात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने जखमी गोवर्धनला अकोल्यातीलएका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, दुसऱ्या दिवशी १७ जानेवारीला गोवर्धन हरमकार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


गोवर्धन हरमकार यांच्या मृत्यूप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

किशोर जुनघरे, पोलिस निरीक्षक, अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या