अकोला जिल्ह्यातील सकल राजपूत क्षत्रिय समाजाची बैठक, महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांना निवडून आणण्याचा निर्धार...
अकोला लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री अनुपजी धोत्रे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार आज येथे पार पडलेल्या जिल्ह्यातील सकल राजपूत क्षत्रिय समाजाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. मनोजसिंह बिसेन यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरजी सावरकर,आमदार अमोलजी मिटकरी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि सकल राजपूत क्षत्रिय समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्री धोत्रे यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी केले. त्यासाठी सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले. या बैठकीला भाजपा पदाधिकारी गणेश अंधारे, माजी नगरसेवक विजय इंगळे, गणेशराव पावसाळे, वैकुंठ ढोरे, धनंजय धबाले, विनोद मापारी, बाळ टाळे, सुजित ठाकूर, मनोज सिंह बिसेन, अजय सेंगरजी, संजयसिंह बैस, निखिलसिंह ठाकुर, सचिनसिंह ठाकूर, बादल सिंह ठाकुर, शिवपालसिंह ठाकुर, रवीसिंह बैस, धर्मसिंह ठाकूर, राजेशसिंह चव्हाण, मदनसिंहजी, शिवपालसिंह ठाकुर, विक्रमसिंह ठाकुर, अर्जुनसिंहजी बिसेन, दिलीपसिंह ठाकुर, उदयसिंह ठाकूर, शेरसिंह ठाकूर, सुमितसिंहजी ठाकूर, सतपालसिंह यांच्यासह क्षत्रिय राजपूत समाजाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487





0 टिप्पण्या