Ticker

6/recent/ticker-posts

खेट्री येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती व इद साजरी

खेट्री येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती व इद साजरी


प्रतिनिधी नासीर शेख 
पातूर : पातूर तालुक्यातील खेट्री येथे गुरुवारी दि.११ एप्रिल रोजीच्या सकाळी ग्राम पंचायत कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली ,याच दिवशी मुस्लिम बांधवांनी ईद सुध्दा साजरी केली,सकाळी ईदगहवर मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या नंतर मुस्लिम बांधव व हिंदू समाजाकडून ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेची पूजा व हार अर्पण करून ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली,यावेळी सरपंच जहूर खान,उपसरपंच शेख राजीक,ग्राम पंचायत सदस्य मो.राईस,शेख लाल,शेख तन्वीर,गजानन लांडे, फैज नबील,सय्यद समीर, बाबुराव तिडके,ग्राम पंचायत कर्मचारी महादेव भोपुलकार ,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या