Ticker

6/recent/ticker-posts

पातुर रस्त्यावर भिषण तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यु

पातुर रस्त्यावर भिषण तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यु

पातूर
अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातूर रस्त्यावर अपघात झाला आहे. या तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. बाळापुरात राहणारे दुचाकीवरून दररोजचं काम संपवून घरी जात होते. आज संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. अपघात घटनास्थळी नाारीकांनी एकच गर्दी केली होती. या तिहेरी अपघाता मधे अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातूर रस्त्यावरील वाडेगावजवळ तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तिघे युवक मोटारसायकलवरून ट्रिपल सिटी येथून वाडेगावकडे जात होते.यादरम्यान समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर तरुण रस्त्यावर पडले आणि पाठीमागून येणाऱ्या ट्रकने तीन तरुणांना चिरडले, त्यात तिघे जागीच ठार झाले. मृत्युमुखी पडलेले तिघेही बाळापूर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख सादिक शेख रज्जाक वय 45 वर्ष, शेख खालिद शेख रज्जाक वय 40, शेख माजीद शेख सादिक वय 24 वर्ष हे तिघेही बाळापूर येथील रहिवासी आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की तिघांच्या शरीराचे अनेक अवयव विद्रुप झाले असून रस्त्यावर रक्ताचे लोट दिसत होते. तर दुचाकीवरील ३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच वाडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून मृतांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या