केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अकोल्यात विविध ठिकाणी स्वागत, 6 लोकसभेचा घेणार आढावा
अकोला
देशाचे यशस्वी गृहमंत्री व सहकार मंत्री नामदार अमित भाई शहा राज राजेश्वर नगरीमध्ये आज दिनांक ५ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता येत असून शहरात आठ ठिकाणी त्यांचं स्वागत व जनतेचं अभिवादन ते स्वीकारणार आहेत. सकाळी ११.१५ वाजता हॉटेल जलसा बाळापूर रोड येथे विदर्भातील सहा लोकसभा मतदारसंघातील संचालन समिती व लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणार आहे. देशाचे गृहमंत्री नामदार अमित भाई शहा यांचा सुरक्षा दृष्टी तसेच वेळेच्या महत्त्व लक्षात घेता व दिवसभराच्या कार्यक्रमाची व्याप्ती लक्षात घेता गाडीतून जनतेचं अभिवादन व निवडक ठिकाणी स्वागत ची व्यवस्था करण्यात आली असून पदाधिकारी कार्यकर्ते व जनता जनार्दनांनी शहरातील शिवर शिवनी नेहरू पार्क, अशोक वाटिका लक्झरी बस स्टॅन्ड पत्रकार चौक वाशिम नाका बाळापूर नाका याच ठिकाणी जनतेचं अभिवादन ते स्वीकारणार आहेत. त्यानंतर जलसा इथे अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील संचालन समिती व पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणारा आहे.
कुठेही न थांबता सुरक्षा दृष्टी आणि दिवसभरातील कार्यक्रमाचा व्याप्ती पाहता नामदार अमित भाई शहा यांचा कार्यक्रम मध्ये सुधारणा करण्यात आली आहे नुसार कार्यक्रम होणार असून सव्वा एक वाजता अकोल्यावरून ते जळगाव येथे युवा संमेलनाला संबंधित करण्यासाठी जाणार आहेत त्यानंतर संभाजीनगर येथे जाहीर सभा व संचालन समितीच्या बैठकी मार्ग.
दर्शन करणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांची उपस्थिती
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री व सर्वसामान्यांना आधार देणारे लोकनेते देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष सातत्याने पक्ष विस्तारासाठी कार्यरत नामदार चंद्रशेखर बावनकुळे भाजपा संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार खासदार रामदास तडस खासदार अनिल बोंडे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून अकोला जिल्ह्यात खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात आमदार रणधीर सावरकर यांच्या योग्य नियोजनात आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल, किशोर पाटील विजय अग्रवाल जयंत म सने, श्याम बडे नकुल देशमुख तेजराव थोरात अनुप धोत्रे विजयराव जाधव नकुल देशमुख तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे
राज राजेश्वर नगरीमध्ये प्रथमच येत असल्यामुळे नागरिकांमध्ये चेतन्य असून त्यांचं आज ठिकाणी भव्य दिव्य स्वागत करण्यासाठी भाजपा व भाजपा मित्र पक्ष महायुतीचे कार्यकर्ते राष्ट्रभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित रहावे जनतेचा अभिवादन व जनतेचा आशीर्वाद देण्यासाठी आपकी बार फिर से मोदी सरकार चारसो के पार करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर व भाजपा अकोला लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी केली आहे




0 टिप्पण्या