Ticker

6/recent/ticker-posts

तुकाराम चौक ते मलकापूर ग्रामपंचायत चौकापर्यंत होणार ४ पदरी काँक्रीटीकरण

तुकाराम चौक ते मलकापूर ग्रामपंचायत चौकापर्यंत होणार ४ पदरी काँक्रीटीकरण



अकोला शहरातील तुकाराम चौक ते मलकापूर ग्रामपंचायत चौकापर्यंत ४ पदरी काँक्रीटीकरण, तसेच पुढील भागात रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण कामाच्या सुमारे २२.९४ कोटी रुपयांच्या १५ की.मी. लांबी च्या काम सुरु करणार..आमदार  रणधीर सावरकर

अकोला
अकोला महानगरला , तसेच  शहरातील विकसित नागरी वस्ती सोबतच ग्रामीण भागाला जोडणारा मलकापूर- येवता- कातखेड-  -येळवण व पुढे मोरगाव पर्यंत जाणारा प्रमुख जिल्हा मार्ग 19 या येळवण टी पाँइंटला जोडणा-या   सुमारे 15 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे टप्पे निहाय  कॉंक्रिटीकरण, रुंदीकरण, डांबरीकरण कामाकरिता  सुमारे  22.94 कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर केले असून या रस्त्याचे बांधकाम सुरू होत आहे, रस्त्याच्या बांधकामाकरिता निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या असून रस्त्याचे बांधकाम अत्यंत तातडीने सुरू करण्यात येत आहे.


 एक लाख नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी दळणवळणाची चांगली सोय उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तांत्रिक अडचणी दूर करून कामाला सुरुवात आज दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मलकापूर चौक येथे होत असून या कार्यक्रमात आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील जयंत मसने विजय अग्रवाल अनुप धोत्रेश्रावण इंगळे अर्चना मसने चंदाताई शर्मा विनोद मापारी विशाल इंगळे गोपाल मुळे  वगारे, नितीन गवळी गणेश अंधारे विजय इंगळे सुमनताई गावंडे , वंचित राव राव पोहरे, वैकुंठ ढोरे बाल टाले शारदा खेडकर संजय बडवणे मंगला सोनवणे एडवोकेट देवाशिष काकड दीप मनवाणि विनोद मनवानी हरीश आदम चंदाने कृष्णा शर्मा तसे च सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहे.
सामाजिक दायित्व सोबत नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार  सावरकर सातत्याने प्रयत्नशील राहत असून अकोला महानगरपालिकेच्या माध्यमातून मलकापूर येथील पाईपलाईन मुळे अनेक अडचणी रस्ता निर्मितीसाठी येत होत्या त्यासाठी मनपाला निधी देऊन तो दूर करून तसेच नेहरू  पार्कते संत तुकाराम चौक पर्यंत आमदार गोवर्धन शर्मा तसेच खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या प्रयत्नाने रस्त्याची चौपदरीकरण होऊन चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे संत तुकाराम ते मलकापूर चौक पर्यंत हा रस्ता कॉंक्रिटीकरण झाल्यामुळे एकूण हा रस्ता संपूर्ण दळणवळणासोबत वेळेची आणि आर्थिक बचत होऊन एक चांगल्या पद्धतीने काम होणार आहे तसेच मलकापूर ते येवता येळवण या ग्रामीण भागात जाणाऱ्या एमआयडीसी भागातील कामगारांना व्यापाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा आमदार रणधीर सावरकर यांनी प्रयत्न केला आहे अकोला शहरातील उपनगर म्हणून गौरक्षण रोड आणि मलकापूर हा परिसर मोठ्या संख्येत राहणारा नागरिकांना हा दिलासा देणारा रस्ता चा भूमिपूजन होत असून या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सर्व राष्ट्रप्रेमी विकास प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकाच्या करण्यात आली आहे ‌
तसेच दलित तांडा वस्ती निर्मिती अंतर्गत डोंगरगाव ते बाबुळगाव बाबुळगाव ते पांढरी बोदखेड गुड्डी बाबुळगाव बाबुळगाव शंभूशेज महाराज मंदिर सभा मंडप अनुसूचित जाती अंतर्गत रस्त्यांचे विविध कार्यक्रम सुद्धा जनतेला सुविधा करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी निधी उपलब्ध करून देऊन विकास कामाला गती दिली आहे लवकरच सांस्कृतिक भावना सोबत शहरातील विविध कार्यक्रमाला व जिल्ह्यातील विकास कामाला भाजपा लोकप्रतिनिधी चालना देणार असल्याचेही भाजप सूत्रांनी माहिती दिली.


अकोला शहराच्या क्रीडा आणि संस्कृती प्रेमींसाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितेमुळे निधी परत गेला. त्यामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. सुविधासाठी निधीची गरज लक्षात घेता आमदार रणधीर सावरकर यांनी तांत्रिक अडचण दूर करून राज्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापना झाल्यानंतर निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आणि पंधरा कोटी रुपये निधी उपलब्ध करून देऊन कामाला गती देण्याच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला गती दिली व आज क्रीडा संस्कृतिक भवन रामदास पेठ येथे सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग, महानगरपालिका व भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेऊन येत्या दोन दिवसात कामाला सुरुवात करून प्रस्तावित कामकाजाबद्दल माहिती जाणून घेतली. येत्या दोन दिवसात कामाला सुरुवात होणार असून लवकरच सांस्कृतिक खेळभवन, नाट्यप्रेमी आणि क्रीडाप्रेमींच्या सेवेत रजू होणार असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त करून राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा पवार, सुधीर मुनगुंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या