Ticker

6/recent/ticker-posts

अपहार करणाऱ्या सचिवावर विभागीय चौकशी करून कारवाई करा, ग्रामपंचायत सदस्याचे विभागीय आयुक्ताकडे तक्रार

अपहार करणाऱ्या सचिवावर विभागीय चौकशी करून कारवाई करा, ग्रामपंचायत सदस्याचे विभागीय आयुक्ताकडे तक्रार


प्रतिनिधी नासीर शेख 
पातूर : पातुर पंचायत समिती अंतर्गत सावरगाव झरंडी ग्राम पंचायतच्या तत्कालीन सचिवाने शासनाच्या लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्याच्यावर विभागीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सावरगाव येथील ग्राम पंचायत सदस्य जानू बाबूसिंग राठोड यांनी अमरावतीच्या विभागीय आयुक्तकडे दिलेल्या तक्रारीतून केला आहे. सावरगाव व झरंडी ग्राम पंचायतच्या तत्कालीन सचिवाने जवळपास दहा लाख रुपयांचा अपहार केला होता. तसेच सावरगाव येथे शेळी गोठ्याचे बांधकाम न कर्ता सचिव व दोन लाभार्थ्यांनी काही वर्षांपूर्वी लाखोंचे देयक लाटले होते. अपहार करणाऱ्या सचिवावर निलंबनाची कारवाईसाठी सायवणी येथील सामाजिक कार्यकर्ता विजयकुमार बळीराम ताले,यांनी पातूर पंचायत समितीच्या आवारात तसेच अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील मोबाईल टावरवर चढून अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सचिवावर विभागीय चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्याला जवळपास दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनही सचिवावर कारवाई करण्यात आली नाही,


सचिवावर वरिष्ठ अधिकारी मेहरबान
गेल्या दोन वर्षांपूर्वी पातुर पंचायत समिती अंतर्गत सावरगाव झरंडी ग्राम पंचायतच्या तत्कालीन सचिवाने जवळपास दहा लाखांचा अपहार केल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले होते. तरीही त्यांच्यावर अद्यापही कारवाई केली नसून,त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

भ्रष्ट सचिवावर कारवाई न झाल्यास उपोषण
भ्रष्ट सचिवावर विभागीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य जानू राठोड यांनी तक्रारीतून केली आहे. भ्रष्ट सचिवावर कारवाईं न झाल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या