मेरा बूथ मजबूत बूथ - सकारात्मक प्रचार करा ना. चंद्रकांत दादा पाटील
अकोला
देशाचे पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांनी आपल्या बूथ चि लढाई जिंकून आपल्या बुथवर ३७० मत वाढविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार प प्रत्येक कार्यकर्ता, पदाचीकारी मेरा बूथ मजबूत बूथ हे अभियान राबवावे. विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास केल्यामुळे मोदी व भाजपा महायुतीवर जनतेचा विश्वास असल्यामुळे अपप्रचार विरोधक करणार असून त्यापासून सावध राहून सकारात्मक रित्या सरकारच्या कामकाजाचा प्रचार प्रसर करा व आपल्या बुथवर मताधिक्य वाढविण्याचे दृष्टीने कामाला लागा अस आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना चंद्रकांत पाटील यांनी केले .
मराठा मंगल कार्यालयात भाजपा महानगर व ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी, तालुका पदाधिकारी व निवडणूक संचालन समितीच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी भाजपा प्रदेश सर्चीत्निया आ रणधीर सावरकर हे होते तर मंचावर महानगर अध्यश जयंत मसने, किशोर पाटील, तेजराव थोरात, अनुप धोत्रे, लोकसभा निवडणूक संयोजक विजय अग्रवाल माधव मानकर, सुनील जाधव, रमेश अलकरी, देवाशिष काकड, संजय गोटफोडे, आम्रपाली उपर्वट, राधादेवी तिवारी, कृष्णा शर्मा, चंदाताई शर्मा, वैशालीताई निकम, तस्लीमा बोअरिंगवाले, सुलभ सोळंके, अर्चनाताई मसने, पवन महल्ले, अकोट पंचायत समिती उपसभापती संतोष शिवरकर, आदी मंचावर विराजमान होते.
या वेळी ना चंद्रकांत दादा पाटील यांनी सरळ आणि सोप्या भाषेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून बुथवर करावयाची कामे, प्रचाराची साधने विजयाचे स्त्रोत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प ३० कोटी मत मिळवण्याचे उद्दिष्ट लक्षात घेऊन अकोला लोकसभा मतदार संघात खा संजय भाऊ धोत्रे यांचे पेक्षा जास्त मताधिक्य मिळवून संकल्पासोबत विधानसभा, नगर पालिका, महानगर पालिका निवडणुकीमध्ये महायुती चा झेंडा फडकविण्याचे दृष्टीने कामाला लागा असे आवाहन केले. या वेळी आ रणधीर सावरकर यांनी आज ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील २० हजार नागरिकांशी संवाद साधून महायुतीला विजयाचा संकल्प करून ग्रामदैवत राज राजेश्वर यांना अभिषेक करून अकोला लोकसभा सह महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागी महायुतीचे उमेदवार निवडून देण्याचे साकडे घातले व परत राजराजेश्वर ला नमन करून विशेष प्रार्थना केली. या वेळी विजय अग्रवाल यांनी आपल्या भाषणात वेगवेगळ्या ४५ जबाबदाऱ्या संदर्भात मार्गदर्शन केले व या वेळी भाजपा पदाधिकाऱ्यांना ना पाटील यांचे शुभहस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्य्तात आले. या वेळी अकोंला पूर्व विधानसभा मतदारसंघच्या वादीने सागर तायडे मित्र परिवाराचे वतीने शिवाजी महाराजांचि प्रतिमा भेट देण्यात आली. ना पाटील यांनी आशीर्वाद रुपात अनुप धोत्रे यांना सदर प्रतिमा भेट वस्तू दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी नगर प्रमुख व भाजपा प्रसिद्धी प्रमख गिरिश जोशी यांनी केले.
अकोला
विकसित भारत व महाशाली राष्ट्र निर्माणासाठी सर्वांचे मत जाणून घेण्यासाठी पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांनी संकल्प घोषणा पत्रामध्ये सर्व सामान्याच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी देशातील एकमेव पार्टी असून सन २०१४,२०१९ and २०२४ मध्ये मते जाणून घेऊन कार्य करत असल्यामुळे विकासाचे मानबिंदू व विकास व विश्वासाची ग्यारंटी नरेंद्र मोदी असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
अकोला लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पार्टी व महायुती चे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या घोषणा पत्रामध्ये स्थानिक, राज्य व देश पातळीवर योजना संबंधी नागरिकांचे प्रत्येक विधानसभे मध्ये २० हजार पेक्षा जास्त नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी मतपेटी ठेवण्यात येत असून त्या पेटीचा शुभारंभ जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचे कार्यक्रमात ते बोलत होते. स्थानिक जयहिंद चौक, शिवाजी पार्क, भाजपा कार्यालय व जिल्ह्यात २०० ठिकाणी मतपेटी ठेवण्यात येत असून ना चंद्रकांत दादा पाटील यांचे वतीने या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विजय अग्रवाल होते तर प्रमुख अतिथी आ. रणधीर सावरकर, अनुप धोत्रे, आ. आकाश फुंडकर, किशोर पाटील, जयंत मसने, निलेश निनोरे, रमेश करिहार, संतोष पांडे, दिलीप मिश्रा,गिरीश जोशी,देवाशिष काकड, सुमनताई गावंडे, चंद्रशेखर पांडे गुरुजी, माधव मानकर, पवन महल्ले, राजेंद्र गिरी, संजय गोटफोडे, नायसे, सतीश ढगे, राहुल देशमुख, सारिका जैस्वाल, शाम विंचनकर, संदीप गावंडे, गणेश अंधारे, अनिल गरड, आरती घोग्लीया, चंदा शर्मा, कृष्णा शर्मा, तेजराव थोरात, अर्चना चौधरी, सिद्धार्थ शर्मा, तुषार भिरड, साठे, शर्मा, विलास शेळके, वैशाली शेळके आदी प्रमुख्याने उपस्थित होते.
या वेळी, अनुप धोत्रे यांनी नरेंद्र मोदी यांची विकासाची ग्यारंटी व देवंद्र फडणवीस यांचा विकासाचा संकल्प व महायुती तील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व अजित दादा पवार यांची साथ, स्व. भाऊसाहेब फुंडकर, मोतीरामजि लहाने, गोवर्धन शर्मा, शंकरराव राजनकर, स्व. तिडके, स्व. आंधळे, वसंतराव देशमुख, स्व. मानकर, स्व अण्णासाहेब मुंडगावकर, शंकरराव खंडेलवाल, सारख्या जेष्ठांच्या त्याग व तपस्या व त्यांनी दाखविलेल्या मार्गदर्शनात खा. संजयभाऊ धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ. वसंत खंडेलवाल व जिल्ह्यातील पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख महायुतीतील शिवसैनिक व संघ परिवारातील सर्व जेष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी व राष्ट्रभक्त पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांना मानणारा वर्ग यांच्या बळावर अकोला लोकसभा मतदार संघात सातव्यांदा महायुतीचा झेंडा फडकविणार असा विश्वास व्यक्त केला. या वेळी आमदार सावरकर यांनी भारतीय जाता पक्ष व महायुतीचा कार्यकर्ता हा हनुमान असून कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळवून विदर्भ सर्वात जास्त मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला. या वेळी खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत मसने, संचालन विजय अग्रवाल तर आभार प्रदर्शन रमेश अलकरी यांनी केले.
चंद्रकांत दादा पाटील यांचे उपस्थित वंचित व उबठा सेनेचे कार्यकर्ते सहित २ हजार कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश-
▪︎ मुस्लीम, मागासवर्गीय, आदिवासी महिलांचा ही समावेश
• अनुप धोत्रे यांचे उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर युवा शक्तीची पहिली पसंद महायुती
अकोला
गेल्या १० वर्षामध्ये सर्व सामन्यांच्या अशा – आकांक्षा, जात – पात धर्मा पेक्षा गरीब याला केंद्र बिंदू मानून गरीब, शेतकरी, सर्व सामान्य युवा आणि मातृशक्ती यांचा विकास करण्याचा संकल्प घेऊन सर्व क्षेत्राचा विकासासोबत पायाभूत योजना निर्माण करून विकसित भारत निर्माण करण्याचा संकल्प घेऊन पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांचेवर सर्व जाती धर्माचा विश्वास असून या देशाचा विकास भाजपच महायुती करू शकते त्यामुळे जनता जनार्दन भारतीय जनता पक्षाच्या महायुती व नरेंद्र मोदी यांचेवर प्रेम असल्याने ४०० के पार NDA सरकार परत सत्तेत येणार असून युवा नेतृत्व अनुप धोत्रे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर दलित, मुस्लीम, मागासवर्गीय व समाजातील सर्व घटकांचा मातृशक्तीचा प्रवेश ही प्रचंड विजयाची नांदी असल्याचे प्रतिपादन भाजपा माजी प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
स्थानिक स्व. नामदेवराव पोहरे सभाग्रून मराठा मंडळ कार्यालय येथे २ हजार पेक्षा जास्त विविध पक्षाचे कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करून पंतप्रधान ना नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे व अकोला जिल्हा भाजपा नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील हे होते तर मंचावर आ रणधीर सावरकर, आ प्रकाश भारसाकळे, तेजराव थोरात, जयंत मसने, विजय अग्रवाल, अनुप धोत्रे, बळीराम शिरास्कर कृष्णा शर्मा, राधा तिवारी, सुलभाताई सोळके, चंदाताई शर्मा, अर्चनाताई मसने, तस्लीमा बोरींगवाले, वैशाली शेळके, आम्रपाली उपर्वट, संतोष शिवरकर, माधव मानकर, रमेश अलकरी देवाशिष काकड, सुमनताई गावंडे, वैशाली शेळके, चंद्रशेखर पांडे गुरुजी, संजय गोट्फोडे, पवन महल्ले, देवेंद्र देवर, राजेश बेले, राजेश रावणकर, संजय इंगळे, संतोष पांडे, निलेश निनोरे, रमेश करिहार, अंबादास घेंगे, गजानन उंबरकार, गणेश अंधारे, सचिन देशमुख, प्रवीण दिक्कर, डॉ शंकरराव वाकोडे, अंबादास उमाळे, संदीप गावंडे आदी मंचावर विराजमान होते.
या वेळी ५० मुस्लीम महिला यांनी भाजपामध्ये प्रवेश करून भाजपा वर विश्वास व्यक्त केला तसेच सुलभ सोळंके यांचे नेतृत्वात २०० आदिवासी महिला तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य, उबठा सेनेचे सुरेश गोरे, वंचित आघाडीचे ज्ञानेश्वर भगत तसेच अकोला शहर, बार्शीटाकळी, अकोट , तेल्हारा अकोला पूर्व या मतदार संघातील विविध सामाजी क कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यांचा ना चंद्रकांत दादा पाटील व मंचावरील नेत्यांनी भाजपाचा दुपट्टा देऊन स्वागत केले. या वेळी आमदार प्रकाश भारसाकळे, यांचे समयोचित भाषण झाले. भाजपा, सिवेसेना, राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी केंद्र व राज्य नेतृतावर तसेच महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त केले व आंपण मतदारांचा विश्वास सार्थ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात सुजलाम सुफलाम अकोला लोकसभा मतदार संघ करण्यासाठी कार्यरत राहू असा विश्वस ब्याक्त केला,. या वेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ रणधीर सावरकर यांनी सनातन संस्कृती व विकास कामे करतांना कोणता ही भेदभाव नाही हे विकासाचे सूत्र घेऊन राज राजेश्वर मंदिराचा विकासासोबत जिल्ह्यातील धार्मिक सामाजिक, भौभोलिक, आर्थिक विकासासाठी खा. संजय धोत्रे व स्व. भाऊसाहेब फुंडकर स्व गोवर्धन शर्मा, स्व.मोतीरामजी लहाने, स्व. शंकरराव राजनकर, स्व. वसंतराव देशमुख, स्व. डॉ प्रमिलाताई टोपले, स्व. विठ्ठलराव सल्पिकार, स्व. शंकरलाल खंडेलवाल सारख्या सर्व जेष्ठ नेत्यांची स्वप्न पुरती व युवा आकांक्षा व मातृशाक्तींच्या भावना चा विचार करून अकोला जिल्ह्याचे विकासासाठी, भाजपा प्रदेश नेतृत्व देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष बावनकुळे, चंद्रकांत दादा पाटील, पंकज ताई मुंडे यांचा विश्वास व मतदारांचा आशीर्वाद अनुप धोत्रे सार्थ करून अकोला लोकसभे मध्ये विजयी होणारच असा विश्वास व्यक्त केला . कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय अग्रवाल यांनी केले.
0 टिप्पण्या