ओबीसी प्रवर्गातील घरकुलाचा अहवाल सादर करा, खेट्रीच्या सरपंचाला बीडीओंचे पत्रद्वारे निर्देश
प्रतिनिधी नासीर शेख
पातूर : पातुर पंचायत समिती अंतर्गत खेट्री येथे मोदी आवास घरकुल योजना ओबीसी परिपत्रक 'ड' यादीतील नावे वगळून खोटी ग्रामसभा घेऊन घरकुलाच्या जवळील नवीन लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट केल्याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश पातूरचे गटविकास अधिकारी यांनी सरपंचाला पत्रद्वारे दिले आहे. खोटी ग्राम सभेचा ठराव पारित करून जुन्या यादीतील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांची नावे वगळून जवळील लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करून तशी यादी पातूर पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी बीडीओकडे दिलेल्या तक्रारीतून केला होता. सदर तक्रारीची दखल घेत ओबीसी प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्यांचा अहवाल पंचायत समिती कार्यालयात सादर करण्याचे निर्देश बीडीओंनी खेट्रीच्या सरपंचाला पत्रद्वारे दिली आहे.
प्रतिक्रिया
ओबीसी प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्या संदर्भात अहवाल सादर करण्याबाबतचे पत्र बिडिओ कडून प्राप्त झाले असून, नियम प्रमाणे ग्रामसभा घेऊन ओबीसी घरकुलाच्या लाभार्थ्यांची नावाची यादी सादर केली आहे.
जहूर खान सरपंच खेट्री
ओबीसीच्या घरकुल लाभार्थ्यामध्ये खडबड
खेट्री येथे ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुला संदर्भात तक्रारीवरून बिडिओनी सरपंचाला अहवाल सादर करण्याचे पत्रद्वारे निर्देश दिले त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांमध्ये एकच खडबड उडाली आहे.
0 टिप्पण्या