Ticker

6/recent/ticker-posts

खेंडकर विद्यालयातील विद्यार्थी अदनान शहा ने रोवला मानाचा तुरा

खेंडकर विद्यालयातील विद्यार्थी अदनान शहा ने रोवला मानाचा तुरा 


अकोला
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झालेल्या 'पश्चिम भारत ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेमध्ये अकोला क्रीडा प्रबोधनीच्या खेळाडूंनी सहभाग घेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केले. स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून खेळाडूंनी १५ पदकांची कमाई केली. यामधे विष्णुपंत खेंडकर माध्यमिक विद्यालयातील वर्ग ८ वी चा विद्यार्थी अदनान शहा सलीम शहा याने कांस्य पदक प्राप्त केले आहे.या आधी सुद्धा अदनान शहा ने खेलो इंडिया मधे प्रतिनिधीत्व करुन स्थान पटकावले आहे. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. 


बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया, वेस्ट झोन बॉक्सिंग काऊंन्सिल, गुजरात बॉक्सिंक असोशिएशनद्वारा अहमदाबाद येथे 'पश्चिम भारत सब ज्युनिअर' बॉक्सिंग स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेत देशभरातून खेळाडूंनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र संघामध्ये अकोला क्रिडा प्रबोधनीच्या खेळाडूंनी स्थान मिळविलेले असल्याने विष्णुपंत खेंडकर विद्यालयातील अदनान शहा ने स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व केले असल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. विष्णुपंत खेंडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक निलेश खेंडकर तर स्वर्गीय यमुनाबाई खेंडकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अल्केश खेंडकर यांनी त्याला मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवांकित केले. यावेळी शाळेतील शिक्षक प्रज्ञानंद थोरात गोपाल वानखडे, श्रीकांत पागृत त्याला भविष्यात यश संपादनासाठी शुभेच्छा देतात. अदनान आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांना देतो.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या