पातुर मधुन तिघांसह जिल्ह्यातून पाच गुन्हेगार हद्दपार, सराईत गुन्हेगारावर एसपींची कारवाई
पातूर : अकोला जिल्हा अंतर्गत टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यावर आळा बसावा याकरिता चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील उमरा येथील सराईत गुन्हेगार विजय रामदास चंचरे ३९, रामसिंग रामदास चंचरे ३०, गजानन रामदास चंचरे ३४, या तिघांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केल्याची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी २२ फेब्रुवारी रोजी केली आहे. यांच्यावरील गुन्ह्यांची मालिका पाहता त्यांचेविरुद्ध हद्दपार करण्याचा प्रस्ताव चान्नी पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला होता,सदर प्रस्तावावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत अकोला जिल्ह्यातून तिघे जणांना एक वर्षासाठी हद्दपार केल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी २२ फेब्रुवारी रोजी पारित केले आहे.
अकोला शहरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये तसेच विविध प्रकारचे गुन्हे करणा-या गुन्हेगारी वृत्तीचे इसमांवर कायदयाचा धाक राहावा याकरीता पोलीस अधीक्षक श्री. बच्चनसिंह, अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन शहरातील १) विशाल भगवान पाखरे रा. शिवणी, अकोला. (पो.स्टे.एमआयडिसी) २) करण रामचंद्र तायडे रा. क्रांतीनगर शिवणी, अकोला. (पो.स्टे. एमआयडिसी), ३) सागर शांताराम अवचार रा. आंबेडकर नगर, अकोला (पो.स्टे. सिव्हील लाईन), ४) धनंजय दिलीप पवार रा. गजानन नगर, डाबकीरोड. (पो.स्टे. डाबकी रोड), ५) जयराज सतिश पांडे रा. रतनलाल प्लॉट, अकोला. (पो.स्टे. सिव्हील लाईन) या आरोपींविरूध्द दाखल गुन्हयांचे स्वरूप पाहता त्यांचेविरूध्द कलम ५६ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये अकोला जिल्हयातुन हददपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी अकोला यांचेकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार उप विभागीय दंडाधिकारी अकोला यांचे आदेशान्वये उपरोक्त ०५ गुन्हेगार प्रवृत्तीचे इसमांना अकोला व बाळापुर तालुक्यातुन ६ महिन्याकरीता हददपार करण्यात आलेले आहे. अकोला जिल्हा पोलीस प्रशासन कडुन जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी यासाठी कारवाईस न जुमानणा-या सराईत आरोपी विरुध्द प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे सुरू आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या