Ticker

6/recent/ticker-posts

खेट्री येथे शिवजयंती साजरी

खेट्री येथे शिवजयंती साजरी


प्रतिनिधी नासीर शेख
पातूर : पातुर तालुक्यातील खेट्री येथे ग्राम पंचायत मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पक हार घालण्यात आले. तसेच सरपंच जहूर खान यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाला उजाळा देत उपस्थित मंडळींना मार्गदर्शन करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले, तालुक्यातील सरपंच यांनी महाराजांचा आदर्श पुढे ठेवून ग्रामपंचायत स्तरावर विकास कामाचे नियोजन केले तर निश्चितच गावाचा विकास व ग्रामस्थांची कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असे आपल्या भाषणातून बोलता वेळेस पातुर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा खेट्री येथील सरपंच जहूर खान,यांनी सांगितले कार्यक्रमाच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन लांडे, बाबुराव तिडके, प्रमोद गंगाधर पजई, शेख युसुब, शेख तन्वीर, व ग्राम पंचायत कर्मचारी माधवराव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या