उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे जाहीर आभार आमदार सावरकर यांच्या मागणीची दखल
अकोला
ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस ह्यांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे राज्यभरातील हजारो सुशिक्षित बेरोजगार अभियंते यांना महावितरण सोबत कंत्राटदार म्हणून काम करण्याची, रोजगाराची संधीउपलब्ध करून दिली याबद्दल अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे. महावितरण मध्ये दुरुस्ती, देखभाल तसेच नवीन जोडण्यासाठी अनेक कंत्राटदारांची नियुक्ती वार्षिक किंवा बहुवार्षिक तत्वावर करण्यात येते. ह्या वर्षी अश्या नियुक्त्या करण्यासाठी मुख्य अभियंता महावितरण ह्यांनी निर्गमित केलेल्या अटी व शर्ती ह्या अत्यंत जाचक स्वरूपाच्या होत्या. त्यातच अशक्यप्राय म्हणजे किमान २५ किमी चा भूमिगत उच्च दाब वहिनीचा अनुभव बंधनकारक केला होता. वास्तविक पाहता महाराष्ट्रात मुंबई,नागपूर,पुणे,संभाजीनगर अशी काही मोजके शहरे वगळता भूमिगत वाहिन्या कुठेच नसून त्यामुळे इतर भागातील कंत्राटदारांना ह्याचा अनुभव असणे अभिप्रेत नव्हते. ह्यामुळे काही निवडक शहरातील ठराविक कंत्राटदारांना काम मिळाले असते व त्यांनी मग स्थानिक लहान कंत्राटदारांच्या मार्फत काम करवून घेतले असते. ह्यामुळे स्पर्धा पण कमी होऊन निविदा जास्त रक्कमेत जाऊन महावितरण चे नुकसान सुध्दा झाले असते. स्थानिक अभियंतांचे फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असते व अकोल्याचे जिल्ह्यातील आर्थिक देवाण-घेवाण मोठ्या कंपनीमध्ये झाली असती व अकोल्यातील उद्योगधंदे सोबत विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या नुकसान झाला होता झाले असते यासंदर्भात अकोला जिल्हा अभियंता इलेक्ट्रॉनिक्स असोशने आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्यामार्फत राज्याची उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात अडचणी व ज्याचक अटी संदर्भात माहिती दिली. याची ताबडतोब नामदार देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन आश्वासन ची मागणी पूर्तता केली विशेषता आमदार रणजीत सावरकर हे अभ्यासू नेतृत्वासोबत अभियंता असल्यामुळे त्यांना समस्याची जाण असल्यामुळे त्यांनी या संदर्भातल्या बाबी नामदार फडणवीस यांना सांगितल्यावर त्यांनी ताबडतोब निर्णय घेऊन निर्णय घेऊन न्याय दिला.
अकोला जिल्ह्यातील कंत्राटदार संघटनांनी अकोल्याचे कर्तव्यदक्ष आमदार श्री रणधीरजी सावरकर ह्यांची भेट घेऊन त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली असता त्यांनी तत्काळ ह्याबाबत मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस ह्याना संपर्क करून लहान कंत्राटदारांवर नव्याने लादलेल्या अन्यायकारक अटी व त्या अनुषंगाने महावितरणचे व कंत्राटदारांचे नुकसान कसे होईल ह्यांचे तांत्रिक विवेचन केले. मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ह्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने ह्याबाबत अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेशजी चंद्रा ह्यांना ह्याबाबत तपासणी करून महावितरणचे तसेच लहान कंत्राटदार ह्यांचे हित जोपासण्याचे निर्देश दिले . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर व लोकल याला महत्त्व लक्षात घेता या सूत्राचा वापर करून भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार श्री रणधीरभाऊ
सावरकर यांच्याशी संपर्क करून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी सुधारणा करण्याचे निर्देश निर्गमित केल्याची माहिती दिली. अवघ्या ४/५ दिवसातच दिनांक १५.०२.२०२४ रोजी सुधारित पात्रता निकष निर्गमित करण्यात आले असून त्यामुळे लहान कंत्राटदार वर्गात ह्याबाबत अतिशय आनंद व्यक्त होत आहे. ह्यामुळे राज्यातील सर्वच लहान कंत्राटदार ह्यांना न्याय मिळणार असून त्या अनुषंगाने संघटनेतर्फे ह्याबाबत मा.उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांचे तसेच आमदार रणधीरभाऊ सावरकर ह्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोशियन अकोला जिल्हा तर्फे करण्यात आले. आज असोशियन तर्फे आमदार सावरकर यांचे सत्कार व गौरव करून नामदार फडणवीस यांचे अभिनंदन केले.
0 टिप्पण्या