विदर्भ स्तरीय शरीर सौस्ट स्पर्धा आंबेडकर श्री 2024 होणार उद्या
अकोला युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आणि शरीर मजबूत ठेवण्याची सवय लागावी यासाठी गेल्या 9 वर्षेपासून अकोल्यात आंबेडकर श्री शरीर सौस्टव स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी ही स्पर्धा उद्या दिनांक 24 फेब्रुवारीला स्थानिक स्व. वसंत देसाई मैदानावर संध्याकाळी 7वाजता होणार आहे.
आंबेडकर श्री 2024 हे टायटल प्राप्त करणाऱ्या स्पर्धकाला 21हजार रुपये आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. बेस्ट पोजर ठरणाऱ्या स्पर्धाकाला 18हजार रुपये रोख आणि चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेला विशेष उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर, सौ अंजलीताई आंबेडकर आणि राजेंद्र पातोडे हे उपस्थित राहणार आहेत ्यासोबतच अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, प्रा संजय खडसे, डॉ आशुतोष डाबरे यांचीही उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती आज पत्रकार परिषदेत प्रबुद्ध भारत बहू. संस्थेचे महेंद्र डोंगरे यांनी दिली.
यावेळी प्रा. राहुल माहुरे, ऍड.. आकाश हराळ, विशाल नंदागवळी, आदित्य बावनगडे,प्रशिक मेश्राम, कुणाल डोंगरे, आर्यन मेश्राम, अमोल उके, प्रथमेश कठाणे आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या