Ticker

6/recent/ticker-posts

मूकबधिर निवासी विद्यालय अकोला येथे मातृ पितृ पुजन दिवस

मूकबधिर निवासी विद्यालय अकोला येथे मातृ पितृ पुजन दिवस


 2 फेब्रुवारी 2024 रोजी संत श्री आसारामजी बाप्पु आश्रम अकोला यांच्या मार्फत तुळशिरामजी बगाटे मूकबधिर निवासी विद्यालय अकोला येथे मातृ पितृ पुजन दिवसाचा कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यालयामध्ये मुकबधिर दिव्यांग मुलांना मातृ पितृ पुजनाचे महत्वं सागंण्यात आले. मातृ पितृ पुजनाच्या वेळी प्रा. मालतीताई रौंदळकर मॅडम यांनी मातृ पितृ पुजनांचे महत्वं काय आहे हे मुलांना समजावुन सांगीतले व मातृ पितृ यांचे आदर सन्मान नेहमी करावा असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्रीमती लक्ष्मीताई तु.बगाटे हे उपस्थित होते त्यांनी संत श्री आसाराम बाप्पु आश्रमचे आभार मानले व पुढिल या दिव्यांग मुलांनसाठी असे कार्यक्रम नेहमी आपल्या शाळेत घ्यावे अशी विंनती केली., त्यासोबत अॅड. राजेश इंगळे साहेब, श्री कृष्णाभाई संचालक (आसाराम बाप्पू आश्रम अकोला), श्री केशव करांगले व सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमांचे संचालन श्री रुबल इंगळे सर यांनी केले व समारोप श्री शैलेद्रं बगाटे सर यांनी केले.


संत श्री आसाराम बाप्पु आश्रम अकोला यांच्या माध्यामातुन दिव्यांग मुलांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व परिक्षेकरिता Exam Pad चे सुध्दा वाटप करण्यात आले. एकंदरित सदर उपक्रम व शालेय वाताराण आनंदमय व मातृ व पितृमय झाले होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या