१ मार्चपासून इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा
सर्व पालक व SSC ( दहावी ) च्या परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या सर्वं विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या साठी काही महत्त्वाच्या सूचना
👉🏻 सर्वप्रथम मनातील भिती काढून टाका हे दहावीचे वर्ष आहे शिक्षणातील शेवटचे वर्ष नाही
👉🏻 तुमचे रिसिट हे अत्यंत महत्त्वाचे आहे .कंपासमधील साहित्य परीक्षेसाठी तयार ठेवा .पट्टी ,पेन(2 ) , पेन्सिल ,रबर ,गणित ,विज्ञान साठी लागणारे साहित्य आदल्याच दिवशी तयार ठेवा .
👉🏻 परीक्षेसाठी अर्धा ते पाऊण तास घरातून लवकर बाहेर पडा .
👉🏻 सकाळी नऊ पूर्वीच तुमचा अभ्यास पूर्ण करावा त्यानंतर चिंतन करत सर्व वस्तू सोबत घेतल्या आहेत याची खात्री करा .
👉🏻 वर्षभर केलेल्या अभ्यासाचे चिंतन मनन करा .
👉🏻 धावत पळत पेपरला न जाता शांतपणे परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करा.
👉🏻 उत्तर पत्रिका हातात आल्यावर चेक करा
👉🏻 प्रश्नपत्रिका पूर्ण वाचा .गोंधळून जाऊ नका .सर्व प्रश्न ओळीने सोडवा .अक्षर चांगले काढा .
👉🏻 प्रेझेंटेशन चांगले असावे .
👉🏻 आकृत्या सुबक काढा त्याला नावे द्या .
👉🏻 पूर्ण युनिफॉर्म असणे आवश्यक आहे ,आयकार्ड घालणे आवश्यक आहे .
👉🏻 पालकांनी आपली गाडी उत्तम स्थितीत ठेवा घरातून परीक्षेच्या ठिकाणी पोहचण्यास किती वेळ लागतो याचा अंदाज घ्या .जवळ असेल तरीही लवकर निघा . 10:30 पूर्वी परीक्षा स्थळी पोहचणे अत्यंत गरजेचे आहे .
👉🏻 पेपर खूप सोपे असतात .त्यामुळे तुम्ही छान पेपर लिहिणार आहात चिंता करु नका
👉🏻 पुस्तकाचे वाचन करा .धड्याखालीलच स्वाध्यायातील जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात .त्यामुळे त्यावरच जास्त भर द्या .
👉🏻 जेवण करुनच पेपरला जावा .
👉🏻 आजारी पडणार नाही याची काळजी घ्या .तब्येत सांभाळा .
👉🏻 कॉपी करणार नाही हे मनाशी पक्के ठरवा .अभ्यास करून च पेपर लिहा .
👉🏻पालकांनी सूचना दिली तर उलटून बोलु नका .ते तुमच्या हिताचेच सांगतात .
👉🏻 गणिताचा सराव करा ,हमखास गुण मिळवून देणाऱ्या प्रश्नांची उजळणी करा .
👉🏻 सकाळी उठल्यावर स्वतः च्या मनाशी बोला .आज मला पेपर खूप छान जाणार आहे .जो मी वर्षभर अभ्यास केला तो परीक्षेत मला सर्व काही आठवणार आहे .मला पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत पण काळजी कोणत्याही गोष्टीची करायची नाही बिन्दास्त परीक्षेस सामोरे जा
👉🏻 आई वडीलांचे ,शिक्षकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत
👉🏻 आरोग्य सांभाळून खूप खूप अभ्यास करा .भरघोस यश मिळवा .आई-वडीलांचे, शिक्षकांचे,आपल्या शाळेचे व आपल्या गावचे नाव उज्ज्वल करा
SSC बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या