Ticker

6/recent/ticker-posts

उच्च शिक्षण संचालक डॉ धनराज माने व इतरांनी केलि शासनाची फसवणूक

उच्च शिक्षण संचालक डॉ धनराज माने व इतरांनी केलि शासनाची फसवणूक


आम आदमी पार्टीचा पत्रकार परिषदेतून आरोप

अकोला श्रीमती राधा बाई सारडा महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने डॉ संजय देशमुख यांना 28जुलै 2021रोजी च्या आदेशाने निलंबीत केले आहे. त्यानंतर त्यांना निलंबीत काळातील निलंबन भत्ता संस्थेने दिला नाही. त्यासाठी डॉ देशमुख ह्यांनी नागपूर न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने तो भत्ता देणे संस्थेला बंधनकारक आहे. असा अंतरिम आदेश दिला. मात्र त्या आदेशाची अंमलबजावनी केली नाही उलट त्यावर स्थगनादेश मिळवला. ही शासनाची फसवणूक असल्याचा आरोप आज अकोल्यात आम आदमी पार्टीचे जिल्हध्यक्ष कैलास प्राणजळे, महानगर अध्यक्ष मसूद अहमद खान व शिक्षक आघाडी चे गजानन बुलूकळे यांनी पत्रकार परिषदेत केला


सध्या राज्यातील नोकरशहा विद्य. न्यायालयालाही जुमानत नसल्याचे दिसत आहे. विद्य. उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही संस्थेने त्या आदेशाचे पालन न करता उलट त्या आदेशाला प्रति आव्हान दिले. त्यामुळे स्थगनादेश मिळवत आदेशाची अवमानना केली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, सह संचालक डॉ मुरलीधर वाडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वशिष्ट चौबे व सारडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांनी संगणमत करून ही फसवणूक केली असून आम आदमी पार्टी अकोला या प्रकरणी फौंजदारी प्रकरण दाखल करण्याची तयारी करत असल्याचे पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आज सांगितले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या