संत रविदास महाराज सर्व भारतीयांसाठी पुज्यनिय_डॉ अशोक ओळंबे
मन चंदा तो कठौती में गंगा !
अकोला _आपल्या काव्यरचनेतून मानवता आणि समतेची शिकवण देणारे संत रोहिदास महाराज हे १५व्या ते १६व्या शतकातील भक्ती चळवळीचे भारतीय गूढ कवी-संत होते लोक त्यांना काही राज्यात संत रैदास नावाने ओळखत होते उत्तर प्रदेश,बिहार,राजस्थान,गुजरात,महाराष्ट्र,मध्य प्रदेश,पंजाब आणि हरियाणा या आधुनिक प्रदेशांमध्ये गुरू (अध्यात्मिक शिक्षक) म्हणून पूजनीय होते कवी,समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती होती श्री संत रविदास महाराज मित्र मंडळाच्या वतीने स्थानिक अकोला रेल्वे स्टेशन येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भाजपा नेते ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ अशोक ओळंबे, नीरज बजाज व सर्व वेंडर बंधूंनी संत रविदास महाराज यांचे पूजन करून महाप्रसाद विरणास सुरुवात केली यावेळी रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवासी व नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाला अमर जपसरे अशोक पितळे खुशाल जीराजे दिनेश कुरील श्याम मानकर राजेश पर्वते बबलू देशमुख टोनी जयराज मनीष कांबळे दीपक जपसरे प्रेम जयसिंहकर,दुर्गेश जपसरे मित्र मंडळ व वेंडर स्टॉपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 टिप्पण्या