Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद

अकोला 
नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले. विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्त्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. अशा शब्दात अकोला लोकसभा भाजपा  प्रमुख अनुप संजय धोत्रे यांनी आपली  श्रद्धांजली अर्पण केली. भाजपा ओबीसी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार बळीराम सिरस्कार,   उमेश पवार मनीराम टाले श्रीकृष्ण मोरखडे गणेश तायडे, अकोट पंचायत समिती उपसभापती संतोष शिवरकर राजेश  नागमते डॉक्टर अमित कावरे यांनी सुद्धा आपले भाव सुमन व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.
ॐ शांती 🙏


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या